महसूल, क्रुषी विभागाची शिवजयंतीची सुट्टी रद्द पीएम किसान योजनेचा २४ला शुभारंभ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महसूल, क्रुषी विभागाची शिवजयंतीची सुट्टी रद्द पीएम किसान योजनेचा २४ला शुभारंभ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीशेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा व्हावे. यासाठी शासनाची लगीनघाई सुरू असून, महसूल व क्रुषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची शिवजयंतीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.तसे परिपत्रक क्रुषी, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विकास विभागाने जारी केले आहे.

शिवजयंतीची या विभागाची सुट्टी रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्याची सरकारची घाईगडबड सुरू आहे.केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत ६ हजार रुपये वार्षिक देण्याची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी लवकर करण्यासाठी युध्दपातळीवर शासनाचे प्रयत्न सुरु आहे.या योजनेचा शुभारंभ २४ फेब्रुवारी रोजी करण्याचे केंद्र शासनाने निश्चित केले आहे.यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झालेले नाही.ते २४ फेब्रुवारी पर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण व्हावे यासाठी महसूल व क्रुषी विभागाचे अधिकारी कर्मचारी राबत आहे.मंगळवारी शिवजयंतीची सुट्टी असल्याने काम बंद राहू नये ,यासाठी त्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर बोलावले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ २४ फेब्रुवारी रोजी करण्याचे केंद्र शासनाने निश्चित केल्याने, सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती कोणत्याही परिस्थितीत २० फेब्रुवारी पर्यंत अपलोड करण्यातचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या योजनेशी संबंधित सर्व कार्यालये १९ फेब्रुवारी रोजी सुरू ठेवावी व या कार्यालयातील सर्व आधिकारी कर्मचारी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करावी.