जिल्हा माहिती कार्यालयाच्या चांदा ते बांदा चित्ररथाला पालकमंत्र्यांची हिरवी झेंडी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चांदा ते बांदा चित्ररथाला पालकमंत्र्यांची हिरवी झेंडी

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर :
जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या मुद्रा व चांदा ते बांदा योजनेवरील चित्ररथ, तसेच मिशन सेवा, यशोमुद्रा व पीक विमा घडिपुस्तिकेचे तसेच प्रधानमंत्री पीक विमा, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माहितीपटाचा शुभारंभ राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 


जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या दोन चित्ररथांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि खास चंद्रपूरसाठी असणाऱ्या चांदा ते बांदा योजनेचा प्रचार प्रसार या चित्ररथामार्फत होणार आहे.

जिल्ह्यांमध्येही चित्ररथ फिरणार आहेत. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ना.मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या तीन प्रकाशनाचे आज प्रकाशन झाले. 

यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘मिशन सेवा’ या प्रकल्पासाठी यशाची गुरुकिल्ली ठरणाऱ्या ‘मिशन सेवा, यशाची प्रेरणा’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटात पार पडले  या पुस्तिकेत जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार,  महेश्वर रेड्डी, सहायक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी देखील यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेच्या संदर्भात लिखाण करणा-या लेखकांचा सहभाग आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक श्री.सुरेश वांदिले यांनी आपले योगदान दिले आहे. सोबतच नियोजन विभागाद्वारे निर्देशित यशोमुद्रा हे पुस्तक देखील याठिकाणी प्रकाशित झाले. जिल्हा नियोजन अधिकारी तथा मुद्रा बँक योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जी.आर. वायाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा उपस्थित होते.
    
माहिती कार्यालयाद्वारे आजचे तिसरे प्रकाशन आहे. पिक विमा योजनेच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील उपस्थित होते. या शिवाय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्यमान योजना व पीक विमा योजना या दोन्ही विषयांवर तयार