मूल येथे शालेय कार्यक्रमांचे थाटात उदघाट्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मूल येथे शालेय कार्यक्रमांचे थाटात उदघाट्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर-मूल :

 लहान मुलांमधे लहानपानापासूनच काही उपजत गुण असतात. त्याला खतपाणी देऊन संस्कारक्षम बालक बनविण्यास पालकांनी प्रयत्नरत असावेत. मात्र काही पालकांच्या अपेक्षा फार मोठया असतात सर्वच मूल त्या अपेक्षा पूर्ण करू शकतात असे नाही, यामुळे पालकांनी आपल्या मुलाची क्षमता ओळखून त्यावर अपेक्षा लादाव्यात. असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान मूल्यमापन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य चंदू पाटील मारकवार यांनी मूल येथे सुभाष उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून मत व्यक्त केले. 
                      
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नाट्य दिग्दर्शक,  कलावंत तथा ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर होतें तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वम्भर शिंदे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे पूर्व विदर्भ प्रमुख प्रा.महेश पानसे,विद्या प्रसारक मंडळाचे सचिव माणिकराव जगताप, कार्याध्यक्ष मनोहरराव कापडे, डॉ आशिष कुलकर्णी. नगरपरिषद मूल चे सभापती अनिल साखरकर, शिक्षक संघांचे उपाध्यक्ष सुनील गायधने,प्रा. मारोतराव पुल्लावार. आदी मंचावर उपस्थित होते.

या वेळी क्रीडा सामन्याचे उदघाटन मशाल पेटवूनव स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी सलामी देऊन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी भविष्यातील पिढी संस्कार मय व नीतिमूल्ये जोपासणारी घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहा. शिक्षक बंडू अल्ल्लीरवार, प्रास्ताविक मुख्यध्याप अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार सहा शिक्षिका रीना मसराम यांनी केले. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर शालेय विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्ये सदर करत उपस्थितांची मने मोहित केली.