पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी थेट संवाद : कन्यका मंदिर चंद्रपूर येथे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी थेट संवाद : कन्यका मंदिर चंद्रपूर येथे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर व महानगर तसेच जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील भाजपा तालुका पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, शहर पदाधिकारी, सामाजिक बुद्धिजीवी, माजी सैनिक, व्यावसायिक, गृहिणी,जेष्ठ नागरिक  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12ते 3वाजेपर्यंत पक्षसंघटनात्मक बाबींवर व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारा थेट संवाद साधणार आहेत.

चंद्रपूर येथे स्थानिक कन्यका परमेश्वरी सभागृह कस्तुरबा रोड येथे होत असलेल्या या संवाद कार्यक्रमास केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, मनपा गटनेते वसंता देशमुख, जि. प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, पं स सभापती वंदना पिंपळशेंडे, भाजपा चंद्रपूर तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले,उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.