बस स्थानक गोंडपिपरी येथे शिवजयंती साजरी : प्रत्येकाने आदर्श घ्यावा अश्या खास वैशिष्ट्यांची सर्वाना आठवण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बस स्थानक गोंडपिपरी येथे शिवजयंती साजरी : प्रत्येकाने आदर्श घ्यावा अश्या खास वैशिष्ट्यांची सर्वाना आठवण

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी प्रतिनिधी):

बस स्थानक गोंडपिपरी येथे शिवजयंती साजरी : प्रत्येकाने आदर्श घ्यावा अश्या खास वैशिष्ट्यांची सर्वाना आठवण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राकेश पुन यांनी करत भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करत महाराजराज्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
महाराजांनी महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष कधी केला नाही या विचारांचा पुनरुच्चार करत आचरण करण्याचा प्रयत्न.  


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला.

 वयाच्या केवळ २९ व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते हे प्रत्येकांनी कधीही नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा त्यांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत.

या प्रसंगी कार्यक्रमास राकेश पुन,संजय झाडे , चेतन सिंग गौर,बालूभाऊ फुकट, बस आगार प्रमुख व्ही बी मोरे, परशुराम मडावी, आगारातील सर्व कर्मचारी व  प्रवाश्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.