आदिवासी मुळनिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदिवासी मुळनिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (जिवती):
गोंडी संस्कृती हि देशाची महान आदर्श संस्कृती आहे.ती प्रत्येकानी जतन केली पाहिजे असे प्रतिपादन व त्याचाबरोबर चांगले उच्च शिक्षण घ्यावे जेणे करुन समाजाचा विकास व्हावा असे प्रतिपादन कार्यक्रमा प्रसंगी केले आहे.

जिवती तालुक्यातील मौजा महापाढ़रवाणी येथे गोंडवाना समाज प्रबोधन मेळावा पार पडला आहे.  या प्रसंगी कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक निरंजनभाऊ मसराम ,कार्यक्रमाचे अध्यक्ष, गोदरु जुमनाके तर कार्यक्रमाचे उदघाटक, कर्नु धुर्वे होते. कार्यकमाचे प्रमुख अतिथि सत्तरशाह कोटनाके माजी सरपंच, भोजी आत्राम,भीमाराम मेश्राम माजी सभापति, लक्ष्मण मंगाम  जिवती,करवाते सर,मलकु  कोटनाके,आनंदराव कोटनाके,अनिता धुर्वे माजी सरपंच, तुकाराम धुर्वे,सागर कोटनाके,पांडू कोटनाके,मोते सर,वासुदेव गेडाम,उपस्थिती होते.या कार्यक्रमाचा प्रस्तविक तुकाराम धुर्वे व सूत्रसंचालन भोजु सिड़ाम तर आभार मोहन आत्राम यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
भीमराम मेश्राम, मारोती कोटनाके,संभा कोटनाके,व समस्त महापांढरवाणी येथील युवक मंडळी यानी  परिश्रम घेतले.याप्रासंगी मार्गदशनवर भाषणे झाले आहे.कार्यक्रमाला समस्त समाज बंधवानी मोठी उपस्थित होती.