महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर :

स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मध्ये 30 वा रस्ता सुरक्षा अभियान 2019 साजरा करण्यात आला. संपूर्ण भारत देशा अंतर्गत रास्ता सुरक्षा जागृती अभियान राबविण्यात येत आहेत. 


रास्ता सुरक्षा सप्ताह निमित्या ने महाविद्यालयातील सैन्य विज्ञान विभागा मार्फत रास्ता सुरक्षा या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर येथील श्री. विश्वंभर शिंदे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांनी रास्ता सुरक्षा आणि कायदे या विषया वर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात भारतात लाखोंच्या संख्येत अपघात होतात व यात मृत्युमुखी पडणारे व अपंगत्व येणाऱ्यांची ची संख्या वाढत चाली आहे. तसेच आज  युवकांद्वारा वाहन चालवतांनी करण्यात येणाऱ्या वेड्या धाडसाला वेळीस लगाम घालवयाला हवी आणि प्रत्येक नागरिकांनी वाहन चालवितांना नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे तसेच विविध परिवहन विषयाच्या कायद्याची माहिती त्यांनी दिली. 

या कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थान प्राचार्य सौ. ज्योति भूते यांनी भूषविले व अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,त्याचप्रमाणे पाहुणे म्हणून डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी उपस्थिती दर्शविली, तर कायर्क्रमा चे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सैन्य विज्ञान विभाग प्रमुख प्रा. योगेश टेकाडे यांनी केले, तर आभार प्रा. स्वप्निल बोबडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नंदूरकर, प्रा. भेंडे, प्रा. कवाडे व सैन्य विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.