सास्ती येथे युवक काँग्रेस चे चलो पंचायत अभियान:महाराष्ट्र युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची उदघाटक उपस्थिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सास्ती येथे युवक काँग्रेस चे चलो पंचायत अभियान:महाराष्ट्र युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची उदघाटक उपस्थिती

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : (शोएब शेख -राजुरा ):        
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या कोडसा  खाणींची मायभूमी असलेल्या सास्ती येथे राजुरा  विधानसभा युवक काँग्रेस द्वारा चालो पंचायत अभियान उपक्रमाचे यशश्वी आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे जिल्हाअध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे हे होते.उदघाटक  म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजुरा काँग्रेस कमिटी चे  अध्यक्ष दादा पाटील लांडे, सास्तीचे माजी  सरपंच तथा जेष्ठ नेते जगन्नाथ चन्ने, युवक काँग्रेस प्रदेश चे महासचिव शिवनीताई वडेट्टीवार, युवा काँग्रेस चे चंद्रपूर जिल्हा महासचिव शंतनू धोटे, चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश कोत्तावार  इर्शाद शेख, आदी मान्यवर विचारमंचावर उपस्तिती होते.

काँग्रेस चे प्रेरणादायक नेते स्व. इंदिरा गांधी, संजय गांधी,राजीव गांधी यांच्या अधिक परिक्रमातून काँग्रेस मध्ये  युवक काँग्रेस ची बहारदार वेल उभी राहिली या मध्यमातून देशात काँग्रेसचे  अनेक वर्तृत्वाने नेते तयार झाले. आज चलो पंचायत  अभियानयाच्या माध्यमातून युवकांना काँग्रेस च्या या परंपरे सोबत  जोडून एक देश व्यापी संपर्क होत आहे.
चलो पंचायत हे काँग्रेस आणि देशाला ताकत देणारे अभियान.

-जिल्हा अध्यक्ष माझी आमदार सुभाष धोटे 
कार्यक्रमात सागर चन्ने,प्रभाकर बघेल ,ईश्वर दुपारे,अनिल पिंपळकर,यादव  डावरे, अनिल पिंपळकर,दिलीप इयंकर, दिलीप चावरे,बंडू  भोयर, गजानन दिवसे,नागेंद्र  सोनुर्ले,श्रीकांत लोणारे ,अनिल वांढरे,सुनील बहिरे, या सहा अनेकांनी काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी सस्ती येथील गुरुदेव महिला मंडळाच्या स्वच्छता दूत म्हणून  सेवा देणाऱ्या महिला भगिनींना युवक काँग्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आला. 

प्रसंगी चंद्रपूर लोकसभा राजुरा विधानसभा काँग्रेस च्या विविध घटनात्मक नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवक काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकार्ये मोठया  संख्येने उपस्तित होते. नगराध्यक्ष अरुण बाऊ धोटे उपनगराश्याक्ष,नगरसेवक,सरपंच, उपसरपंच कार्यक्रमाला राजुरा व सस्ती क्षेत्राचे नागरिक व युवक महिला मोठ्या संख्येने उपस्तित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एजाज अहेमद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन फुलझेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष शेंडे यांनी केले.