ब्रेकिंग न्यूज :आनंदवन चौकात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : तीन ठार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज :आनंदवन चौकात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : तीन ठार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (वरोरा):


चंद्रपूर नागपूर महामार्ग वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो दिनांक १६ फेब्रुवारी ला सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आनंदवन चौकातील चौफुली वर नागपूर वरून येणाऱ्या भरधाव ट्रॅकने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी स्वार, त्याची पत्नी व मुलगी यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.चंद्रपूर नागपूर हा महामार्ग अतिशय व्यस्त महामार्ग असून शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान बोर्डा येथील ईश्वर भास्कर मिलमीले ( वय ४५), पत्नी अलका ईश्वर मिलमिले ( वय ३४) व मुलगी समृद्धी मिलमिले ( वय ७) हे प्रकृती डॉक्टरांकडे दाखवण्याकरिता आपल्या दुचाएच 34 के डब्लू 4163 क्रमांकाच्या दुचाकीने  वरोऱ्याच्या दिशेने जात असताना अचानक मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने दुचाकीला धडक दिली.


धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी स्वार व त्याचे दुचाकीवरील सहकारी खाली पडल्याने ट्रकच्या समोरचा चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अल्का व समृद्धी हिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी स्वार ईश्वर हा गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला असून या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे .