नोकरीची संधी :राज्यात लवकरच होणार तलाठी भरती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नोकरीची संधी :राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र ( मुंबई) - 


केंद्र व राज्य सरकारच्या नोकरभरतीवर बेरोजगांरामध्ये कमालीचा असंतोष सुरू असताना राज्यात लवकरच दोन हजार तलाठ्यांची भरती सुरू होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांना खूश करण्यासाठी महाभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

२२ प्रकारच्या संवर्गातील भरतीत तलाठी या संवर्गाची सर्वाधिक पदे असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. या तलाठी भरतीच्या फाईलला अंतिम मंजुरी मिळाली असून, आठवडाभरात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 
 तलाठी पदभरतीची प्रक्रिया या वेळी जिल्हा निवड समितीमार्फत राबविण्यात येणार नाही. यासाठी राज्यात एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा २०० गुणांची असून, १०० प्रश्‍न असतील. यासाठी मराठी, इंग्रजी, अंकगणित व सामान्यज्ञान या विषयावर प्रश्‍न असतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पदांचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवाराला कोणत्याही एकाच जिल्ह्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. ज्या जिल्ह्याचा प्राधान्यक्रम दिला आहे त्याच जिल्ह्यात गुणवत्ता यादीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल. या परीक्षेची सर्व जबाबदारी ‘महापरीक्षा-ऑनलाइन’ या सरकारच्या अधिकृत यंत्रणेवर सोपवण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार असून, परीक्षादेखील ऑनलाइनच होणार आहे.  

आरक्षणाचा कोटा
तलाठ्यांसाठीच्या या परीक्षेत खुल्या वर्गातील आर्थिक मागासांसाठी १० टक्‍के आरक्षण राहणार आहे. त्यासोबत मराठा आरक्षणाचा १६ टक्‍के कोटादेखील असेल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. राज्यात ऐन निवडणुकीच्या काळात महाभरतीची प्रक्रिया सुरू होत असल्याने सरकारवर बेरोजगारांची असलेली नाराजी कमी होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. 

परीक्षेची वैशिष्ट्ये
.एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा
. प्रत्येक जिल्ह्याची गुणवत्ता यादी
.एकाच जिल्ह्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार