वरुर येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज ३८९ जयंती उत्सव - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वरुर येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज ३८९ जयंती उत्सव

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (अभिजित डहाके - राजुरा ग्रामीण):

राजुरा तालुक्यातील वरुर येथे  सर्वधर्मीय युवा ग्रुप चा वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाचा सर्वधर्मीय गावकऱ्यानी  पुढाकार घेत आमच्या सहभाग घेतला. 

जे आतापर्यंत नाही झाले ते आज करूयात!!आपली एकता पुन्हा एकदा दाखवूयात.!!गरज आहे ती आपल्या एकीची..!- भास्करभाऊ वांढरे, सैनिक,भारतीय सेना 

या शब्दला सर्व गावकरी खुप मोटया संख्येनि साथ दिली. दीपावली पर्वासारखीच रांगोळी आणि दिवे लावून गावात शिवाजी जयंती साजरी करण्यात आली, भव्यदिव्य गावात अशी मिरवणूक काढण्यात आली व छोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, वरूर गाव चे आर्मी मध्ये असलेले श्री.भास्करभाऊ वाढरे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.पूर्ण गाव एकत्रित येऊन शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.