हळदीकुंकवाला विचार नियमाची भेट : रामपूर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम : महिलांना आदर्श जीवनासाठी विचार नियम पुस्तकांची भेट - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हळदीकुंकवाला विचार नियमाची भेट : रामपूर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम : महिलांना आदर्श जीवनासाठी विचार नियम पुस्तकांची भेट

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दीपक शर्मा : राजुरा)
भारतीय संस्कृतीनुसार हळदीकुंकू म्हणजे महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक समजले जातात, मार्गशीर्ष पौष महिन्यात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत या सणानिमित्ताने सुवासिनी शृंगार करून हळदीकुंकू लावून वाणे वाटप करीत असते परंतु रामपुर ग्रामपंचायत च्या सरपंच वंदनाताई गौरकार व विस्तार अधिकारी अमरदीप खोडके यांच्या संकल्पनेतून हळदीकुंकुवाचा कार्यक्रम वेगळ्या प्रकारे घेऊन महिलांना दुःखी जीवनातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावशाली जीवनाचे मूल्य असलेले व आदर्श जीवनासाठी विचार नियम असलेल्या पुस्तकाची भेट देण्यात आली.

नुकताच रामपूर ग्रामपंचायतच्या वतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम हनुमान मंदिर सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाला गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या. सुरवातीला ग्रामपंचायतीने कलापथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, स्वच्छता अभियान, हुंडाबळी, साक्षरता अभियान यासंबंधी समाज जागृतीचा संदेश देऊन उपस्थितांचे मनोरंजन केले.

दुःख आणि महिला या एकाच नान्याच्या दोन  बाजू आहे, सुखी कुटुंबाचा गाडा चालविताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते, यासाठी महिलांनी आत्मविश्वास बाळगून स्वावलंबी होण्याचे आव्हान सरपंच वंदनाताई गौरकार यांनी केले, तर उपसरपंच हेमलताताई ताकसांडे यांनी धकाधकीच्या जीवनात महिला सर्वांच्या गरजा पूर्ण करीत असताना मात्र स्वतः शारीरिक व मानसिकरित्या कमजोर होत आहे यासाठी महिलांनी येणाऱ्या संकटाला न घाबरता आलेल्या परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत बाळगण्याची गरज असून त्यासाठी प्रभावशाली जीवनाची मूल्य व आदर्श जीवनासाठी विचार नियम या पुस्तकाचे वाचन केल्यास जीवनात कधीही महिला अपयशी ठरणार नसल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत च्या सरपंच वंदनाताई गौरकर, उपसरपंच हेमलताताई ताकसांडे, ग्रामपंचायत सदस्य सिंधुताई लोहे, सुनीता उरकुडे, अनिता आडे, लक्ष्मी चौधरी, संगीता विधाते, संगणक परिचालक गणपती चौधरी, ग्रामविस्तार अधिकारी अमर्दिप खोडके, लिपिक नितीन तानकर यासह शेकडो महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.