पाकिस्तानला मोठा झटका; सुरक्षा परिषदेत चीनचा भारताला पाठिंबा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाकिस्तानला मोठा झटका; सुरक्षा परिषदेत चीनचा भारताला पाठिंबा

Share This
खबरकट्टा / राष्ट्रीय बातमी :
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा परममित्र मानल्या जाणाऱ्या चीनने भारताने मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.


पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याचा सुरक्षा परिषदेत तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भारताने हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला होता.

जगातील अनेक मोठ्या देशांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची निंदा केली आहे. आता चीननेही भारताला पाठिंबा दर्शवल्याने हा पाकिस्तानला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.