खबरकट्टा / चंद्रपूर :
गेल्या दोन महिन्याचे महावितरण वीज बिल न भरल्यामुळे चंद्रपूर जिल्यातील दहा बीएसएनल टॉवर मागील सात दिवसापासून बंद असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोय होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी व कोरपना तालुक्यातील दहा टॉवर बंद असून चंद्रपूर बीएसएनल विभागीय कार्यालय सातत्याने याचा पाठपुरावा मुंबई सर्कल कार्यालयात करत असून तातडीने ही समस्या सोडविण्यास कार्यतत्पर आहोत असे उपव्यवस्थापक आर एन कोलते यांनी प्रतिनिधींना सांगितले. मुंबई येथे दररोज पाठपुरावा सुरु असून लवकरच टॉवर पूर्वस्थितीत सुरु करण्यात येतील तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल वर टॉवर ट्रान्सफॉर्मर सुरु केले असून अनेक ठिकाणी सेवा पूर्ववत झाली आहे.
गोंडपिपरी शहरात दोन टॉवर्स असून येथील ट्रान्सफॉर्मर ला वृत्त लिहेपार्यंत कुलूप स्थितीत असून येथील कोणत्याही कर्मचार्यांशी संपर्क होऊ शकला नाही व ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था आढळली नाही.
मागील सात दिवसापासून टॉवर ठप्प असून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे पुढच्या दोन दिवसतात जर कोनतीही व्यवस्था करण्यात आली नाही तर सर्व ग्राहकांसोबत चंद्रपूर कार्यालयास घेराव करू असा इशारा गोंडपिपरी येथील नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव राकेश पून यांनी दिला आहे.