ब्रेकींग न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे शेतकरी आत्महत्या :बँकेचे कर्ज व नापिकी प्राथमिक तपासात उघड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे शेतकरी आत्महत्या :बँकेचे कर्ज व नापिकी प्राथमिक तपासात उघड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (वरोरा प्रतिनिधी):
वरोरा तालूक्यापासून काही अंतरावर असलेल्या टाकळी येथील रहिवासी श्री पुरुषोत्त नामदेव कोल्हे वय45 वर्षे ह्या शेतकऱ्याने कर्ज बाजारी व सतत ची नापिकी ला कंटाळून आपल्या शेतात गळ फास घेऊन आत्महत्या केली. 


प्राप्त माहिती नुसार पुरुषोत्तम कोल्हे हे अल्प भूधारक शेतकरी होते. त्यांच्या वर सरकारी तसेंच खासगी बँकेचे पीक कर्ज होते. सतत ची नापिकी ने त्रस्त होऊन आज दि 19 फेब्रुवारी 2019 ला सकाळी  9.00 च्या दरम्यान ला त्यानी आपल्या शेतात गळ फास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

घटनेचा पंचनामा सुरूअसून शव उत्तरीय तपासनीस पाठविण्यात आले आहे. अधिक तपास वरोरा पोलीस निरीक्षक करीत असून, कष्टाळू शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.