जिल्हा परिषद शाळा चिचाळा(शास्त्री) यांनी राबविले गाव स्वछता अभियान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद शाळा चिचाळा(शास्त्री) यांनी राबविले गाव स्वछता अभियान

Share This
-गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी दिला पाठिंबा

खबरकट्टा /चंद्रपूर (अरविंद राऊत:चिमूर )

चिमूर तालुक्यातील चिंचाळा(शास्त्री) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विदयार्थी व शीक्षकांनी गाव स्वछता अभियान राबविले या अभियानात गावातील नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी खूप मोठा सहभाग दर्शवला.

       
विदयार्थी व गावकरी ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणी ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यांनी सम्पूर्ण गावात प्रभातफेरी काढून स्वच्छते विषयी नारे लावले सम्पूर्ण गाव व गावातील मुख्य परिसर स्वच्छ केला. यात गावकरी लोकांनी खुप मोठा पाठिंबा दिला.महिन्यातिल तिसरा व चौथा शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी जिल्हा परिषद शाळा चिचाळा(शा.)येथील मुख्यध्यापिक सौ.शहारे व शिक्षिका कु.संध्या गोंडाने मेहनत घेत आहेत यांना ग्रामपंचायत चिंचाळा (शा) यांचा खूप मोठा पाठींबा आहे.

लवकरच येत्या काळात हा गाव पूर्ण स्वच्छ व हागणदारी मुक्त होऊन आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.