राहुल पडालवार याना राज्यस्तरीय अष्टपैलु सेवारत्न पुरस्कार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राहुल पडालवार याना राज्यस्तरीय अष्टपैलु सेवारत्न पुरस्कार

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :(बल्लारपूर):

रहिकवार ब्रदर्स फ़िल्म प्रोडक्शन तर्फ राज्यस्तरीय जीवन गौरव 2019 पुरस्कार सोहळा नुकतेच बल्लारपुर येथील गुरुनानक पब्लिस स्कूल च्या मंचावर पार् पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री चन्दनसिंग चंदेल(कैबिनेटमिनिस्टर)वनविकास महामंडल महाराष्ट्र राज्य,तर प्रमुख पाहुने म्हणून प्रसिद्ध  कलाकार सौ कल्पना वाड़े, श्री खंडेलवाल, आर बी फ़िल्म चे श्री गणेश रहिकवार  आणि शार्ट फील्म च्या क्षेत्रातील नावजलेले दिग्दर्शक उपस्थित होते.

याप्रसंगी श्री राहुल पडालवार संचालक ध्यानदीप अकादमी याना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार(अष्टपैलु सेवारत्न) देऊन मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

राहुल पडालवार हे मागील 20 वर्षापासून साहित्य,कला,शिक्षण,समाजसेवा,पत्रकारिता,ध्यान व योगा, तथा नेचरोपैथी च्या क्षेत्रात अविरत कार्य करीत आहेत,त्यांचा कार्यक्षेत्र चंद्रपुर,गडचिरोली बाहेर पसरत आहे,शुन्यतुन सूर्य निर्माण करण्याच्या राहुल पडालवार यांच्या प्रयासास आर बी फ़िल्म तर्फ त्यांना अष्टपैलु सेवारत्न राज्यस्तरीय जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आले,यावेळी इतर महाराष्ट्रात  विविध क्षेत्रातील मान्यवारांच्या हस्ते सत्कार करन्यात आला असून राहुल,याना विविध संस्था नि गौरविलेले आहे ,पन जीवन गौरव प्राप्त झाल्याने त्याच्या मित्रपरिवारातुन कौतुक होत आहे.