कट्टर शिवसैनिक बबन उरकुडे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश : राजुरा विधानसभेत राजकीय सुरुंग - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कट्टर शिवसैनिक बबन उरकुडे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश : राजुरा विधानसभेत राजकीय सुरुंग

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):
  शिवसेना माजी राजुरा तालुका प्रमुख बबन उरकुडे यांनी शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज सायंकाळी राजुरा येथे पार पडलेल्या औपचारिक बैठकीत हजारो कार्यकर्त्यांसह  शेतकरी संघटनेत प्रवेश घेण्याची घोषणा केली.

2019 निवडणुकीचे बदलते वारे आणि सध्यास्थितीत राजुरा विधानसभेची राजकीय तिढा बघता बबन उरकुडे यांनी संघटनेच्या बाजूने उभे राहणे हे संघटनेला फायदेशीर व युतीला नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे या प्रवेशामुळे राजुरा विधानसभेतील अनेक कार्यकर्त्याना पळापळी - जोडाजोडीचा सुरुंग लागला अशी खमंग चर्चा शहरात आहे.

बबन उरकुडे यांची पार्श्ववभूमी बघता त्यांनी तालुक्यात मालिन झालेला शिवधनुष्य हाती घेऊन तालुका प्रमुख  म्हणून अनेक नवीन शाखा उघडत,जनसामान्यांसाठी अनेक आंदोलन उभे केले  व हजारो कार्यकर्ते जोडून शिवधनुष्याची जबाबदारी उत्तम पेलली.

त्याचसोबत सास्ती गोवरी जिल्हापरिषद निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देत चांगला घाम गाळायला लावला होता  तरीही त्यांना पक्षअंतर्गत राजकारणाला त्यांना बळी पडावे लागले. मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे यांनी अचानक संपूर्ण राजुरा विधानसभा कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर बबन उरकुडे व त्यांचे सर्व कार्यकर्ते बघ्याची भूमिका घेऊन होते. शिवसेनेत आपल्या कार्याची दखल घेत जात नसल्याने व आपल्या कर्तृत्वास वाव नसल्याने एका सच्चा नेत्यासोबत जुडण्याचा निर्णय घेतला असे खबरकट्टा प्रतिनिधींशी बोलताना उरकुडे यांनी मत व्यक्त केले.

निर्णयावर ठाम असून 16 फेब्रुवारी 2019रोजी राजुरा संघटनेच्या कार्यक्रमात सर्व कार्यकत्यांसह अधिकृत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.