एलसीबीची कुंटणखान्यावर धाड: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात कारवाही - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एलसीबीची कुंटणखान्यावर धाड: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात कारवाही

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (शहर प्रतिनिधी):

येथील मूल मार्गावरील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सरकारनगर परिसरातील सगिरा अपार्टमेंटमधील एस-३ या फ्लॅटमध्ये चालणारया कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मुख्य महिला आरोपीसह वेश्या व्यवसाय करणारया पाच महिला तसेच एका पुरूषाला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.


यावेळी पोलिसांनी आरोपी महिलांकडून २७ हजार ४०० हजार रूपये नगदी व नऊ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना चंद्रपुरातील सरकारनगर या उच्चभ्रू वसाहतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात तातडीने एक पथक तयार करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी एक सापळा रचला. ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू च चालतो. त्या सगिरा अपार्टमेंटमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. पोलीस कर्मचारी असलेल्या या बनावट ग्राहकाला वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर संपूर्ण पथकाने सगिरा अपार्टमेंटमध्ये धाड टाकली.
यावेळी पोलिसांनी कुंटनखाना चालविणारया मुख्य महिलेसह पाच महिला तसेच सचिन घनोत याला अटक केली .

या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांकडून २६ हजार रुपये रोख व नऊ मोबाईल जप्त केले . सदर कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, नितीन जाधव, विजय संगीडवार, महिला पोलीस प्रिया पोळे, सपना साखरे, सीमा तावाडे, आरती कच्चेवार, अमजद खान, शंकर मोटेकर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे करीत आहेत.