डिजिटल तंत्रज्ञान शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणार व विद्यार्थ्यांनि डिजिटल वर्गाचे लाभ घ्यावे- आ.बंटीभाऊ भांगडीया - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डिजिटल तंत्रज्ञान शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणार व विद्यार्थ्यांनि डिजिटल वर्गाचे लाभ घ्यावे- आ.बंटीभाऊ भांगडीया

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :(अरविंद राऊत-चिमूर ):

जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे आयोजित डिजिटल वर्ग खोली चे उदघाटन कार्यक्रमास आमदार कीर्तिकुमार(बंटीभाऊ) भांगडीया साहेब प्रामुख्याने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. 

कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रथम पुलवामा येथे आतंकवाद्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.

भाजपा सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देत डिजिटल शाळा बनवून शालेय विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे.

जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे जानेवारी महिन्यात झालेल्या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी ५ वर्गखोल्या डिजिटल करून देण्याचे आश्वासन दिले होते दिलेले शब्द तात्काळ पूर्ण करीत आज दिनांक १५ फेब्रुवारी ला डिजिटल वर्गखोल्याचे उदघाटन संपन्न झाले. 

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांना काळाच्या गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर होऊन शिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती होईल या उद्देशाने चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी स्वनिधीतून ५ वर्गखोल्या डिजिटल करून दिले.

यावेळी भाजप जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूरकर, मा.महादेवरावजी रोहनकर, मा.यशवंतरावजी चिल्लूरे, मा.डॉ.अमीरजी धमानी, मा.रवींद्रजी कावळे,मा.रवींद्रजी समर्थ, मा.संतोषभाऊ रडके, मा.सचिनभाऊ आकुलवार, प्रा.चव्हाण मॅडम,मेंढे सर, बिक्केवार मॅडम, रोहनकर सर, मुलकमवार मॅडम भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह सह शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र उपस्थित होते.