मुर्ती विमानतळ प्रकल्पग्रस्तना मोबदल्यासह "एक सातबारा एक नौकरी" द्यावी - अँड. वामनराव चटप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुर्ती विमानतळ प्रकल्पग्रस्तना मोबदल्यासह "एक सातबारा एक नौकरी" द्यावी - अँड. वामनराव चटप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके/राजुरा):

राजुरा तालुक्यातील मुर्ती येथील आदिवासींची जमीन विमानतळासाठी भुअर्जित करण्यात येत असुन पट्टे असलेल्या सर्व कोलाम शेतक-यांना बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई आणि एक सातबारा एक नौकरी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी केली आहे.


कोलाम ही या भागातील आदिवासी मधील सर्वात मागास जमात असुन या मुर्ती येथील सर्व कोलाम बांधवांसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही कोलाम बांधवांसह अँड. वामनराव चटप यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.

राजुरा येथून १७ किलोमीटर अंतरावरील मुर्ती व कोलामगुडा येथील सतरा कोलाम आदिवासी नागरीकांना  पंधरा वर्षापूर्वी भुमापन क्रमांक ११२/२ या जमीनीचे प्रत्येकी दोन हेक्टरचे पट्टे मिळाले होते. या शेतक-यांनी मिळालेल्या पडीत जमीनीची चांगली मशागत करुन, खतपाणी घालून लागवडयोग्य व सुपीक शेती तयार केली आणि त्यावर आपला उदरनिर्वाह केला.आता येथे विमानतळ होत असल्याने या सर्वांची जमीन भुअर्जित करण्यात येत आहे. परंतू आता ही शेती विमानतळासाठी अधिग्रहित होत असल्याने त्यांचेपुढे जीवनयापन करण्याचा मोठा प्रश्न निर्मान झाला आहे. 

मुर्ती येथील पट्टेधारक कोलाम शेतकरी रामु लिंगू कूमरे, कमलबाई रामू आत्राम, मालू जलामू आत्राम, शामराव लिंगू कुमरे, भिमराव लिंगू कुमरे,मोतीराम शामराव कुमरे, राजु रामु मडावी, पत्रु पग्गु मडावी, भीमा शिडाम,रामु तुकाराम आत्राम, कणीबाई लिंगू कुमरे, लिंगू रामू कुमरे, केशव भिमराव कुमरे, राजुबाई रामु कुमरे, भिमु लिंगु आत्राम, तुळशीराम भिमु कुमरे, राजु मंगु सिडाम या सतरा शेतक-यांची जमीन भुअर्जित होत आहे. याच शेतीवर या सर्वांची उपजिवीका अाहे. म्हणून या सर्व कोलाम आदिवासींना " एक  सातबारा एक नौकरी " आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी  चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.