मोदी सरकारकडून कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर: राजुरा विधानसभेतील नेत्यांची काय आहे प्रतिक्रिया - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोदी सरकारकडून कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर: राजुरा विधानसभेतील नेत्यांची काय आहे प्रतिक्रिया

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(दीपक शर्मा / राजुरा): 


पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी केल्यामुळे या अर्थसंकल्पाला २०१९ च्या मोदी सरकारचा मास्टरस्टोक म्हणून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी या अर्थसंकल्पाला गरीबांचे तोंडाचे पाने पुसणारा अर्थसंकल्प म्हटलं आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे - 

🔷असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा,
🔷 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 
🔷10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार, 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा, 
🔷पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत, किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी सरकार कामधेनू योजना सुरू करणार,
🔷 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार, दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार, गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही.

आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला, आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. 

बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं अश्या बाबीअर्थसंकल्पात मांडण्यात आल्या. 

अर्थसंकल्प प्रतिक्रीया -

सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे व्यावसायिक या सर्वांनाच दिलासा देणारा आणि जनतेच्या आकांक्षा पुर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. ना. पियुष गोयल यांनी संसदेत मांडलेल्या या जनताभिमुख अर्थसंकल्पाने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या असुन देश आणि येथील जनतेला प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्याचे बळ या अभूतपुर्व अशा अर्थसंकल्पाने दिले आहे. मी या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो.
- अँड. संजय धोटे, आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र
 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

"सत्तेत आल्यावर गेल्या चार अर्थसंकल्पात या सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, कर्मचारी,व्यावसायिक यांची पिळवणूक केली. आता निवडणूकीच्या तोंडावर "रायगडाला जाग आली " आणि आता हा निवडणूकपूर्व लोकलुभावना अर्थसंकल्प मांडला आहे. परंतू सरकारच्या तिजोरीत खणखणाट आहे, मग या योजना राबविण्यासाठी निधीचा प्रश्न पुढे कसा सोडविता येईल. हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या जाहिरातबाजीचा एक ट्रेलर आहे, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असेच सर्व दिसेल"
- अँड. वामनराव चटप, माजी आमदार,राजुरा विधानसभा क्षेत्र व विदर्भवादी नेते  
 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


" आज संसदेत मांडण्यात आलेला अर्थसंकल्प हा देशातील करोडो नागरीकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. निवडणूका पुढे ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प म्हणजे एक भुलभुलैय्या असुन जनता या भाजपच्या डावाला चांगली ओळखून आहे. गेल्या चार वर्षात शेतकरी, कामगार,व्यापारी,व्यावसायिक यांच्या झालेल्या नुकसानीचे घाव यामुळे भरुन येणार नाही, अत्यंत निराशाजनक असाच हा अर्थसंकल्प आहे".
- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र व जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी.