स्टार किड्स इंग्लिश मीडिअम स्कूल रामपूर येथे वार्षिकोत्सव साजरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्टार किड्स इंग्लिश मीडिअम स्कूल रामपूर येथे वार्षिकोत्सव साजरा

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर( विशेष प्रतिनिधी-दीपक शर्मा/राजुरा)
स्टार किड्स इंग्लिश मीडिअम स्कूल रामपूर-राजुरा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व लहान विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा या हेतूने उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन बीएमएस चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश वल्लेवार यांचा हस्ते, बीएमएस चे वर्धा व्हॅली बल्लारपूर क्षेत्राचे अध्यक्ष परमानंद पाटील, स्टार किड्स संस्थेचे आर.के. श्रीवास्तव, प्रकाश कापडे, श्रीनिवास कोपुला, ग्राम पंचायत सदस्य अजय सकिनाला यांचे उपस्थित संपन्न झाले. 
 

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. देशभक्तीपर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत मुख्याध्यापिका कविता वाघमारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशश्वीतेकरिता मुख्याध्यापिका कविता वाघमारे, शिक्षिका मिनाक्षी ऐडा, सरिता काटम, मंगला राधारप आणि शिक्षवृत्तेर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.