विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने "नद्या वाचवा" सत्याग्रहाचे वर्धा नदी पात्रात आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने "नद्या वाचवा" सत्याग्रहाचे वर्धा नदी पात्रात आयोजन

Share This
-आंदोलनात सहभागी जनताच आता पुढील काळात हा लढा लढणार : नरेश पुगलीया
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके / राजुरा):
विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या "नद्या वाचवा, ब्यारेजेस (बंधारे) बांधा, पाणी अडवा, शेतकरी, उद्योग, पिण्याचे पाणी वाचवा" आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी खासदार नरेशबाबू पुगलीया करत आहेत.
याच आंदोलनाचे आयोजन आज राजुरा स्थित वर्धा नदी पात्रता करण्यात आलेत.राजुरा तालुक्यातील शेतकरी व जनता बहुसंख्येने उपस्थित झाली होती. पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आनतमात्र स्थानिक पातळीवर च्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठ दाखवली.

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विरोधानंतरही जनतेचा मिळालेला पाठिंबा हाच आमच्या आंदोलनाचा गाभा असुन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र येणे हे आंदोलनाचे खरे फलित असुन यापुढे हे आंदोलन जनताच लढणार असल्याचे स्पष्ट करीत आम्ही फक्त मार्गदर्शन करणार आहोत असे नरेशबाबू गरजले.
ते पुढे म्हणतात रस्ते, नाल्या व सुस्थितीत असलेल्या इमारती पाडून पुन्हा बांधणे म्हणजे विकास नव्हे तर आपल्या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात असलेल्या नद्या अडवून बंधारे बांधून जिल्हा सिंचनाचे सोयी सुविधा उपलब्ध करून दिली तर संपन्न होऊ शकतो, त्यासाठी आवश्यक सोयी पुरविण्यात हे शासन पाच वर्षात अपयशी ठरले आहे त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे.
     राजुरा येथील वर्धा नदीच्या पात्रात एक शामियाना उभारुन हे आंदोलन केल्या गेले याप्रसंगी  राहूल पुगलीया,राजुरा येथील माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सुधाकर कुंदोजवार, अविनाश ठावरी, राजू चंदेल, शिवचंद काले, नासिर खान, सुधाकर राखुंडे, आबाजी पा. ढवस,  नासिर खान, गोदरु पा. जुमनाके, गजानन गावंडे, डॉ. महाकुलकर, हमीद भाई, अ‍ॅड.अरुण धोटे, अविनाश जाधव,साजिद बियाबानी, आनंद दासरी सहित अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.