देसाईगंज येथील मतिमंद विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देसाईगंज येथील मतिमंद विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश

Share This
-पार्वती मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याला रौप्य पदक तर दुसऱ्याला कांस्य पदक

खबरकट्टा / गडचिरोली (देसाईगंज)  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय , क्रीडा संचालनालय व सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक १,२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते.

त्यात पाव॔ती निवासी मतिमंद विद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी चि.तुषार नेपाल चवारे याने बहुविकलांग प्रवग॔ मधून 12 ते 16 वष॔ वयोगटात बादलीत बाॅल टाकणे या खेळात सहभागी होऊन राज्यातून द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) पटकविला तसेच चि.ज्ञानेश्वर दिवटे या विद्यार्थ्यांनी सुद्धा बहुविकलांग प्रवग॔ मधून 8 ते 12 वष॔ वयोगटात बादलीत बाॅल टाकणे या खेळात सहभागी होऊन राज्यातून तृतीय क्रमांक(कांस्य पदक) पटकविले.अगदी आपल्या जिद्द व चिकाटीने या दोन्ही बहुविकलांग विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय खेळांमध्ये सहभागी होऊन यश मिळविले त्याबद्दल संस्थाध्यक्ष श्री.एन.डी.दहिकर , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला.