कोरेपल्ली आणि कवटाराम गावात नरेगा अंतर्गत मजगी कामांचे उदघाटन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरेपल्ली आणि कवटाराम गावात नरेगा अंतर्गत मजगी कामांचे उदघाटन

Share This
खबरकट्टा / गडचिरोली (सेवा वाकडोतपवार -अहेरी ):

दिनांक 26 फेब्रुवारी 2019 ला अहेरी तालुका मधील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येणारे मौजा-कोरेपल्ली आणि कवटाराम गावामध्ये नरेगा अंतर्गत मजगी कामाची उदघाटन येरमनार ग्रा.पं.चे सरपंच श्री बालाजी गावडे यांचा हस्ते करण्यात आले.


त्यामुळे आता कोरेपल्ली व कवटाराम या दोन गावातील प्रत्येक नागरिकाचा हाताला रोजगार मिळालेला आहे.म्हणून शेती सुधार कामा सोबतच रोजगार सुद्धा लोकांना मिळालेला आहे. त्यामुळे कोरेपल्ली आणि कवटाराम गावातील लोकांना त्याचा कुटुंबाचा संसार चालविसाठी आर्थिक आधार मिळालेला आहे. 

यावेळी उपस्थित पंचायत समिती अहेरी येथील नरेगा विभागाचे तांत्रीक अधिकारी श्री आर.बी हेडो साहेब,रोजगार सेवक श्री लक्ष्मण आत्राम,श्री चुंडु तलांडी,श्री मुसा आत्राम,श्री मासा गावडे, श्री दामा गावडे,श्री इरपा गावडे,श्री कटीय्या गावडे,श्री डोबी आत्राम,श्री राजू मडावी व कोरेपल्ली आणि कवटाराम गावातील नागरिक उपस्थित हेते.