चिमुरचे उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांची रेती तस्करांवर धडक कारवाही : सिनेस्टाइल पाठलाग करत ट्रॅक्टर जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमुरचे उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांची रेती तस्करांवर धडक कारवाही : सिनेस्टाइल पाठलाग करत ट्रॅक्टर जप्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर):

सिंदेवाही तालुक्यातील उमा नदी पात्रता, सरांडी गावातून रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असून रेती तस्कर अवैध रेतीच्या भरश्यावर गब्बर होत आहेत. दरम्यान, बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी 2019 सकाळच्या सुमारास उपविभागीय अधिकाऱ्यांनी अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रॅक्टर  पकडल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

रेती घाटावर रेती तस्कर चांगलाच डल्ला मारला असून प्रशासनाला न जुमानता अवैधरित्या रेती घाटावरून रेतीचा उपसा रात्री-बेरात्री केला जात आहे. 

स्थानिक महसूल कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहेत. चिमूरचे उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे हे चिमूर-सिंदेवाही मार्गाने जात असताना रत्नापूर फाट्यावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक्टर दृष्टीपथास पडतास त्याला थांबण्याचा इशारा केला. यावेळी चालकाने ट्रॅक्टर न थांबविता सुमाट वेगाने नवरगावकडे नेला. 

दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करीत काही अंतरावर टॅ्रक्टर पकडण्यात आला. सदर अवैध रेतीचा ट्रक्टर पकडल्यानंतर सिंदेवाही तहसील कार्यालयात नेवून जमा करण्यात आला आहे. तहसीलदार कुंभारे यांना विचारणा केली असता, सदर ट्रॅक्टरवर कारवाईत १ लाख ८ हजार ४०० रु. दंड ठोठाविण्यात आला असल्याचे सांगितले. रेती माफीयांनी डोकेवर काढले असल्याने अवैध रेती तस्करीमुळे शासनाच्या महसूलाला चुना लागत आहे. प्रशासन स्तरावरून धडक कारवाईची मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.