खबरकट्टा / चंद्रपूर :
गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये परत न केल्यामुळे त्यांचेवर गुंतवणूकदार अधिनियम अंतर्गत करवाई करण्याची मनसेची मागणी....चंद्रपूर शहरात मागील सण 2014-15 पासून बालाजी नागरी सहकारी पत संस्था नावाची संस्था रवींद्र सत्यनारायण अंगावार नावाचे व्यक्ती चालवीत होते. काही वर्ष संस्थेचा कारभार सुरळीत सुरू होता त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांनी तिथे गुंतवणूक केली.
त्यातच त्यानी जास्तीत जास्त पैसे संस्थेत जमा व्हावे म्हणून त्यांनी अयप्पा स्वामी एजन्सीमार्फत धनवर्धी नावानी चिटफंड नावानी भीसी सुरू केली.मात्र मागील एका वर्षापासून गुंतवणूकदाराचे पैसे ठेवींच्या मुदतीत गुंतवणूकदारांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र अंगावार परत करण्यास तय्यार नसल्याने संस्थेचे अभीकर्ते एजंट यांचेवर गुंतवणूकदार संतापले.त्यामुळे त्यांनी स्वता जवळून व व्याजाने पैसे घेवून प्रसंगी दैनिक ठेवींच्या रकमेमधून गुंतवणूकदारांना परत केले.
बालाजी नगरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. -राजू कुकडे ,मनसे
मात्र गुंतवणूकदारांच्या ठेवींच्या रकमा आता लाखोंच्या घरात पोहचल्याने ते पैसे द्यायचे कुठून हा प्रश्न संस्थेचे अभीकर्ते एजंट यांना पडल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांचेकडे धाव घेवून आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
मनसेने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून संस्थेच्या अभीकर्त्याना घेवून पोलीस स्टेशन गाठले आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुधा निवेदन देवून गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयाच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह सर्व संचालक मंडळावर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियमा अंतर्गत करवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेकडो ग्राहकांच्या हितासाठी संस्थाचालक व प्रशासनाविरुद्ध मनसे स्टाईल आंदोलन करेन असा इशारा निवेदनातून दिला.या प्रसंगी मनसेचे राजू कुकडे.
बळीराम शेळके.अतुल डिघाडे.आकाश भालेराव.वनिता चिलके. कविता घोणमोडे .सुमन चामलाटे. कोटेश्वरि गोहने यासह संस्थेचे अभीकर्ते एजंट भीमराव डोंगरे.गणेश शेंडे आकाश चांदेकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.