ब्रम्हपुरी तालुक्यात व्याघ्र दहशत कायम: महिलेस केले ठार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी तालुक्यात व्याघ्र दहशत कायम: महिलेस केले ठार

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर (ब्रम्हपुरी):


ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गावाजवळ  पद्मापूर येथील सुभद्रा मोरेश्वर  गेडाम (३२) महिलेचा वाघानी बळी घेतल्यांने, परिसरात पुन्हा एकदा वाघाची  दहशत निर्माण झाली आहे.


सुभद्रा या  आपल्या शेतात लाखोळी खोदण्याकरीता गेल्या असता,  त्यावेळी तिथे दबून बसलेल्या वाघांनी तीचेवर हल्ला केल्यांची माहिती मिळाली आहे.

हळदा परिसरात मागील काही दिवसापासून वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे नागरीक, शेतकरी, महिला, मुले भयग्रस्त झाले असून, या भागात दुपारनंतरच सामसूम होत आहे.

या भागातील वाघांचे दहशतीत जगणाऱ्यांना दिलासा देण्यांसाठी आणि शासनाकडे याबाबतच्या मागण्या पुढे रेटण्यासाठी श्रमिक एल्गारने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी हळदा येथील ज्ञानगंगा विद्यालयात मानव हक्क परिषद घेतली होती.  या परिषदेत परिसरातील 3 हजाराचे वर गावकरी उपस्थित होते. या परिषदेला 24 तास उलटत नाही तोच वाघांनी पद्मापूरात महिलेचा बळी घेतल्यांने गावकऱ्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.