जिवती तालुक्यातील धोंडार्जुनी गावातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती तालुक्यातील धोंडार्जुनी गावातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर(जिवती /चेतन खोके):
        
 मानिकगड पहाडावरील जिवती या अतिदुर्गम व आदीवासी भागातील धोंडार्जुनी या गावातील काँग्रेस, भाजप व बसपाच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी सर्व कार्यकर्त्यांचे  संघटनेचा लाल बिल्ला लावून स्वागत केले.

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेत दिनांक ३१ जानेवारीला रात्री झालेल्या या सभेत जिल्हा सहकारी बँकेचे माजी सचिव प्रभाकर दिवे, माजी जि.प.सभापती  निळकंठराव कोरांगे, जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, बंडू पा, राजूरकर, पदमाकर मोहितकर, देवीदासजी वारे, सैय्यद शब्बीर जागिरदार, नरसिंग हामणे इ. मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात कांग्रेस पक्षाचे  कार्यकर्ते गोवर्धन चव्हाण, रामदास पवार, शिवाजी चव्हाण, गोवर्धन राठोड, वसीम खाँ.शेख, देविदास पवार, सुभाष आडे, गणेश चव्हाण, प्रेमदास राठोड, धनराज चव्हाण, शंकर आडे,शेख खाजा इस्माईल, पोमाजी पवार व राजाराम राठोड यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या शिवाजी पवार, रघुनाथ वाघमारे, दीपक पंचाल, विठ्ठल राठोड, राजेश पवार, सुभाष पांचाळ, गोविंद लालू पवार यांनी माजी आमदार अँड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. बसपा कार्यकर्तेदि दिलीप चव्हाण, अरविंद चव्हाण यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

विशेष म्हणजे यात युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व कार्यकर्त्यांचे अनिल ठाकुरवार, रमेश नळे, भाऊजी कन्नाके ,दिलीप देरकर, मधूकर चिंचोलकर ,दीपाली हिंगाणे,कपिल इद्दे  यांनी अभिनंदन केले आहे.