गोंडपीपरी तालुक्याने आपल्याला भरभरून प्रेम दिले याचा विसर आपणास कधीच पडणार नाही -- आमदार अँड संजय धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपीपरी तालुक्याने आपल्याला भरभरून प्रेम दिले याचा विसर आपणास कधीच पडणार नाही -- आमदार अँड संजय धोटे

Share This
आक्सापुरयेथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
खबरकट्टा / चंद्रपूर :

गोंडपीपरी तालुक्यातील अनेक गावात पायाभूत सुविधा ग्रामीण भागात निर्माण होत आहे.
                   
गोंडपीपरी तालुक्यात नजीकच्या काळात रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्र देखील होईल,असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड संजय धोटे यांनी आज  उदघाटन प्रसंगी बोलताना येथे केले.
गोंडपीपरी तालुक्यातील आक्सापुर येथे २५१५ लेखाशिर्ष निधी अंतर्गत ४० लक्ष रुपयांचा लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक सभागृहचा भूमीपूजन सोहळा आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील घेतलेल्या सभांमध्ये बोलताना त्यांनी गोंडपीपरी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
या तालुक्याने भरभरून प्रेम आपल्याला दिले असल्यामुळे या तालुक्यात शिक्षण,आरोग्य,पिण्याचे पाणी,रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधांनी गोंडपीपरी तालुक्याला एक सुंदर तालुका बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 राजुरा मतदारसंघातील गोंडपीपरी शहर व ग्रामीण भागातील बदल आता लक्षात येण्याइतपत जाणवतो.येणाऱ्या काळामध्ये एका सर्वांगसुंदर मतदारसंघाचे वैभव या राजुरा मतदारसंघाला प्राप्त होईल अक्सपूर गावाला  एकूण १ कोटी ८७ लक्ष रुपये खर्च करून पिण्याचे पाणी, रस्ते,सामाजिक सभागृह,नाली या विविध विकास कामाला सुरुवात झाली आहे.मात्र या सर्व विकास कामांमध्ये या भागातील नागरिकांकडूनही काही अपेक्षा असल्याचे  त्यांनी सांगितले.ते म्हणाले, महाराष्ट्र मध्ये स्वच्छता अभियानात हे गाव पहिले आले पाहिजे.त्यासाठी नागरिकांनी देखील आपले दायित्व निभवावे.त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आज झालेल्या विकासकामांच्या भूमीपूजन व महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती दिपक सातपुते, भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,उपसभापती मनीष वासमवार, जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार, पंचायत समिती सदस्य सौ भूमिका पिपरे, सरपंच सौ अल्का पिपरे,नगरसेवक राकेश पुन,नगरसेवक अश्विन कुसनाके,नगरसेवक सुरेश चरडे,सुरेश धोटे,बळवंत पिपरे,भानेश येगेवार, सौ चिचघरे, उमेशा रामटेके उपस्थित होते.