आजचे राशी भविष्य : 15 फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशी भविष्य : 15 फेब्रुवारी 2019

Share This
खबरकट्टा /आजचे राशी भविष्य : 15 फेब्रुवारी 2019

मेष :

आपल्या अधिकारात वाढ संभवते, त्याचप्रमाणे आपल्या अनुकरणाची इतरांना संधी मिळेल. मात्र संयम व विनय यांची साथ धरल्यास आपण प्रगतीची पावले टाकू शकाल. आर्थिक बाजू सावरता येईल. सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांतही आपणास आगेकूच करता येईल. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. व्यापारात प्रगती साधता येईल. नोकरीत वरिष्ठांची सुलभता जाणवेल. नको ती आव्हाने स्वीकारू नका. प्रकृतीची पथ्ये पाळा. प्रवासात सावधानता बाळगा. मुलांकडून काही सुवार्ता ऐकण्यास मिळतील. कामाचा उरक वाढेल.वृषभ :पुढच्या मार्गावर जाण्यासाठी काही उपाय करावे लागणार आहेत. प्रत्येक कार्यात संयम व श्रम करण्याची जिद्द यांचा वापर करून आपण पुढच्या प्रवासाला जाऊ शकाल. वरिष्ठांशी वादविवाद न करता मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. व्यापार, उद्योगात कोणावरही फार विश्वास न दाखवता स्वयंसिद्ध राहणे ठीक राहील. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नये. राजकीय क्षेत्रात आपला जम बसविण्याची संधी मिळेल. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा.


मिथुन :


विरोधकांची धास्ती न बाळगता, आर्थिक बाजू छानपणे सांभाळता येईल. नोकरदारांना आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. सत्य बोला, कमी बोला, रागावर नियंत्रण ठेवा. ही पथ्ये पाळून आपण आपले उद्दिष्ट गाठू शकाल. कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन छान राहील. एखाद्या शुभसंकेताची वार्ता समजेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. आप्तेष्टांचे भेटण्याचे योग संभवतात. कलाक्षेत्राला वाव मिळेल. प्रकृतीची पथ्ये पाळा.
कर्क :जीवनात काही घटना घडतील. गाठीभेटी, विशिष्ट करारमदार या गोष्टींनी याचा अनुभव येऊ शकेल. नव्या ओळखीने काही लाभदायक गोष्टीही घडू शकतील. आर्थिक दृष्टीने हा काळ चांगला राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. काही उलाढाली होण्याची शक्यता राहील. बौद्धिक गोष्टींना प्रोत्साहन मिळेल. उद्योग व्यवसायात प्रगती साधता येतील. राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कार्याला यशाची झालर मिळू शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. प्रवासाचे योग येतील.


सिंह :


आपणास आवश्यक ते यश मिळविणे सोपे होईल. व्यापार उद्योगात उत्तम प्रगती करता येईल. कलाक्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळेल. आपल्या प्रवासाचे बेत साध्य होतील. नोकरीत बढती, बदलीचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आपल्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळू लागेल. मात्र घरगुती प्रश्न, अडथळे यांच्यामुळे आपल्या नोकरीवर, व्यवसायावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या. प्रश्न सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करा.कन्या :सरळमार्गी काम होणे जरा कठीणच. परिस्थिती काहीशी दोलायमान असली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी निर्णयक्षमता अंगी बाणवणे आवश्यक असणार आहे. काही महत्त्वाच्या बाबीत तज्ञांचा सल्ला घेणे हितकारक ठरणार आहे. आपले आरोग्य, आर्थिक बाजू व नातेसंबंध या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे, त्या दृष्टीने प्रयत्नशील राहा. प्रकृती जपा.


तूळ :

बऱ्याच गोष्टींची अनुकूलता लाभणार आहे. आपली आर्थिक बाजू सावरता येईल. कला, साहित्य क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. महिलांना मनाप्रमाणे खरेदी करता येईल. व्यापार उद्योगात बरीच अनुकूलता लाभेल. आपली बाजू दुसऱ्यांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नव्या परिचयांचा लाभ घेता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. नोकरीत सुलभता जाणवेल. वादाचे प्रसंग टाळा. कायद्याचे उल्लंघन कटाक्षाने टाळा.


वृश्चिक :आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. कोणालाही दुखावणार नाही याची दक्षता घ्या. अनावश्यक खर्च टाळा. घरातील विद्युत-उपकरण जपा. आपल्या कर्तृत्वाला बराचसा उजळा मिळेल, मात्र गर्व करू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. सर्व बाबतीत बचावात्मक धोरण स्वीकारावे. कौटुंबिक व आरोग्याचे प्रश्न अतिशय नाजूक पद्धतीने हाताळावे लागणार आहेत. प्रकृतीची पथ्ये पाळा.


धनु :

यशाचा मार्ग सोपा होईल. कला, साहित्य, शिक्षण, व्यापार या क्षेत्रांत उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्याची दक्षता घ्या. प्रवासाचे योग येतील. प्रेमाची साथ घेऊन आपण अपेक्षित गोष्टी साध्य करू शकाल. नको ती आव्हाने स्वीकारू नका. व्यावहारिक पातळीवर खूप काही हाती लागू शकेल. घरगुती प्रश्नांचा परिणाम आपल्या कामावर होणार नाही याची दक्षता घ्या.


मकर :आर्थिक बाजू बरी असली तरी लहान-मोठ्या वादाचे प्रसंग उद्भवू शकतात, तेव्हा आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रयत्नाची जोड प्रत्येक कार्यात घ्यावी लागणार आहे. धार्मिक वाचन व त्याचे मनन यातून अनेक प्रश्नांची उकल होऊ शकेल. प्रकृतीस्वास्थ्याबद्दल आपण फार जागरूक राहिले पाहिजे. खाण्यापिण्याची पथ्ये कटाक्षाने पाळा. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. सामंजस्याने सर्व प्रश्नांची उकल करा, म्हणजे परिस्थितीतून बाहेर पडता येईल.कुंभ :

आपणास पुष्कळशा गोष्टींत अनुकूलता दिसून येईल, पण ही गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपण काही करू शकणार नाही. गाठीभेटी, चर्चा यासारख्या गोष्टींद्वारे आपण आपले उपक्रम पुढे नेऊ शकाल. कौटुंबिक बाबतीत अपेक्षित गोष्टी उपलब्ध होऊ शकतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवास कराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आर्थिक बाजू सावरता येईल. आपली कामे लवकर व्हावीत या दृष्टीने प्रयत्नशील राहा. अविवाहिताचे विवाह विचारपूर्वक व पूर्वशहानिशा करूनच करणे सध्या योग्य ठरणार आहे.मीन :अनेक गोष्टींतून आपणास मोठे लाभ पदरात पाडून घेता येतील. आपल्या प्रगतीसाठी आळस, सुस्ती यांचा अतिरेक टाळणे महत्त्वाचे राहील. या गोष्टींना प्राधान्य द्या. कामाचे योग्य नियोजनबद्ध कामे सुरू ठेवल्यास आपले ध्येय गाठणे शक्य होईल. वैव‌ाहिक जीवनात काही चांगल्या घटनांचा समावेश राहील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. सरळ मार्गांनी व्यवहार करा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. प्रकृतीस्वास्थ्य जपा.