गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य पोलीसांना समर्पक- शेखर देशमुख - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य पोलीसांना समर्पक- शेखर देशमुख

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (चेतन खोके- राजुरा): 

श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून नियमित लोककल्याणकारी कामे होत असून शासनाकरीता नेहमी मदतगार होत असते, दारुबंदी व्यसनमुक्ती संबंधाने सेवा मंडळाचे कार्य पोलीसांना समर्पक आहेत असे मत राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी साखरवाही येथील श्रीगुरुदेव प्रचारक मेळाव्यात उदघाटक म्हणून व्यक्त केले.

राजुरा तालुक्यातील साखरवाही येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे वतिने ग्रामगीता तत्वज्ञान विचारमंथन सोहळा आयोजीत करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रचार विभाग गुरुकुंज चे केंद्रिय सदस्य अँड.राजेंद्र जेनेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.कल्पणा कोल्हे सरपंच, मोहनदास मेश्राम, अँड.सारीका जेनेकर, प्रा.नारायण बोरकुटे, शेख गुरुजी, बंडु बोरकुटे उपसरपंच,सौ.कालिंदा निर अध्यक्ष तंटामुक्ती,शैलेश कावळे संघटक, हरिदास पहानपटे पोलीस पाटिल,नानाजी डोंगे प्रचारप्रमुख,सौ.सुवर्णा कावळे पो.पा, रामदास चौधरी प्रचारक, पुंजारामजी बरडे,रवी सोयाम मुअ,जेष्ठ प्रचारक रघुजी बुटले गुरुजी आदींची उपस्थिती होती.

गावातील माधवराव रासेकर,मंजुळाबाई वनकर,कवडुजी मडावी यांचा सेवानिव्रुत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निमित्ताने गावाबाहेर श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या स्वागत फलकाचे अँड.जेनेकर यांचे हस्ते अनावरण करण्यात आले, प्रास्तविक देवराव परसुटकर शाखाध्यक्ष यांनी केले तर मोहन मेश्राम,अँड.सौ.जेनेकर,सुवर्णा कावळे, सतिश देवाळकर,प्रा.बोरकुटे आदींनी समयोचित विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाध्यक्ष अँड.राजेंद्र जेनेकर यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार व प्रसार कार्याबाबत विचार व्यक्त केले, सुत्रसंचालन विकास ढेंगरे व कु.तेजस्विनी परसुटकर या दोघांनी तर आभार संतोष रासेकर यांनी मानले, प्रचारक कार्यकर्ता मेळाळ्याला तालुक्यातील सेवा मंडळाचे सर्व शाखाध्यक्षांची हजेरी होती.

कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता रविंद्र बोरकुटे उपाध्यक्ष,सुर्यकुमार आगलावे सचिव,सुधाकर निवलकर, दौलत बोरकुटे, बबन पहानपटे,श्रीमती शांताबाई मत्ते,गंगाराम जगताप,निखिल बोरकुटे,गोलु ढेंगरे,राकेश येमुलवार,रविंद्र लोहे,बंडु परसुटकर, गोसाई बरडे आदींनी अथक परिश्रम घेतले. रात्रौचे कार्यक्रमात मंगेश पोडे,सुधाकर गेडेकर,भाऊराव चोथले यांनी नकलांचे माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजनातून समाजप्रबोधन केले.