अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठींबा : राजुरा तहसिलदारांना जनआंदोलनाचे निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठींबा : राजुरा तहसिलदारांना जनआंदोलनाचे निवेदन

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : (दीपक शर्मा / राजुरा )

गेल्या काही दिवसापासुन आदरणीय अण्णा हजारे लोकपाल नियुक्ती व शेतक-यांच्या हिताचे निर्णयाबाबत राळेगण सिध्दी येथे उपोषण करीत आहेत.

सरकारने याविषयी ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत अण्णा हजारे यांच्या मागणीच्या समर्थनार्थ मा. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी राजुरा चे तहसिलदार डाँ.रविंद्र होळी यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राजुरा तालुका शाखेद्वारे निवेदन देण्यात आले.
अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्ती व शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेशी वारंवार पत्रव्यवहार केला.परंतू अद्यापही या रास्त मागणीविषयी सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. पंतप्रधान भ्रष्टाचाराविषयी फक्त बोलत असतात परंतू ,भ्रष्टाचार कमी व्हावा असे गंभीरपणे वाटत नसल्यानेच लोकपालाची नियुक्ती केली नाही.

देशातील शेतकरी हवालदिल झाला असुन उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी होवून आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत शेतक-यांना दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासत अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतक-यांना वर्षाला केवळ सहा हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद  केली आहे. पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी हा आटापिटा सरकारने चालविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भूमिकेवरुन सर्वसामान्य जनता व भ्रष्टाचार याविषयी आपल्याला काही देणे-घेणे नाही, याच कारणांमुळे व्यथीत होवून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी २०१९ पासुन राळेगण सिध्दी येथे उपोषणाला बसले आहेत.

मा.अण्णा यांच्या या देशहितार्थ केलेल्या मागण्यांना राजुरावासिय जनतेचा पाठींबा असुन त्वरीत मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते मिलींद गड्डमवार, अनिल बाळसराफ,नगरसेवक मधुकर चिंचोलकर, सुरेश बानकर, पेलोराचे सरपंच जितेंद्र दुबे,नानाजी डोंगे, नरेश गुरनूले,दामोधर सातपूते,गणेश बेले, राजु भोयर,प्रमोद दूबे यांनी तहसिलदार यांना दिले.