व्यसनमुक्त जीवन जगा -अरविंद कतलाम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्यसनमुक्त जीवन जगा -अरविंद कतलाम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर(दिपक शर्मा / राजुरा):

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाचे माध्यमातून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश दिला,आजचा युवक घातक व्यसनाचे आहारी जात आहे, युवकांनी चांगले शिक्षण घेत उन्नती करावी,घातक व्यसनाच्या आहारी न जाता व्यसनमुक्त जीवन जगावे असे आवाहन पोलीस स्टेशन विरुरचे ठाणेदार अरविंद कतलाम यांनी केले.


पंचाळा येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व मातामंदीर उत्सव निमित्ताने ग्रामगीता तत्वज्ञान विचारमंथन सोहळ्यात ते उदघाटक म्हणून बोलत होते.श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकरी द्वारा आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीगुरुदेव प्रचार विभागाचे केंद्रिय सदस्य अँड.राजेंद्र जेनेकर होते. याप्रसंगी आशीष मडावी सरपंच, श्री.वडतकर पोलीस उपनिरीक्षक, लटारु मत्ते मुअ, विनोद भोंगळे पो.पा,लक्ष्मण निरांजने अध्यक्ष तंटामुक्ती,किशोर वडस्कर,रंजणा पिंगे,यशोधरा निरांजने,विलास पाटिल मुख्या, मनोहर बोबडे, सुभाष पावडे,परशुराम साळवे,सचिन बोढे, मनिष मंगरुळकर, बाबुमिया शेख आदींची उपस्थिती होती. दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, साहित्य व ग्रामगीता ग्रंथावर विचार प्रकट केले.प्रास्तविक गजानन बोबडे शाखाध्यक्ष यांनी करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ठ केला. यावेळी पो.स्टे.विरुर चे वतिने स्पर्धा परिक्षा पुस्तकांचा संच देवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचणालयाचे उदघाटन करण्यात आले, उपस्थित मान्यवरांना वडस्कर कुटुंबाचे वतिने ग्रामगीता भेट देवून स्वागत करण्यात आले. संचलन श्री.धवने यांनी तर आभार विनायक सोयाम प्रचारक यांनी केले. यानंतर जयश्री गावतुरे याचे किर्तन झाले. आयोजनाकरीता पुंडलिक मडावी,शंकर चोथले,जगदिश आकनुरवार,चंद्रकांत गिरसावळे,विठ्ठल वडस्कर,हनुमान मडावी,रविंद्र वडस्कर,संदिप आकनुरवार,गुलाब चोथले,अविनाश पिंगे,रामदास चोथले, प्रशांत वडस्कर, कवडु देठे यांनी सहकार्य केले.