भाजपा, सेना आणि शे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजपा, सेना आणि शे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा-राजुरा) 

काल  दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ रोज रविवारला काँग्रेस जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे भाजपा, शिवसेना आणि शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे पक्षाचे ध्येय धोरण व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 


             
या प्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. यात काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सदस्यांना मा. जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा दुप्पटा देऊन त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले. यात गोवरी येथील श्री प्रकाश पिसाराम राऊत,श्री मार्कंडी निलकंठ लांडे,श्री महादेव नारायण ताजने,श्री प्रफुल राऊत, श्री किशोर बबन ताजणे,श्री अमर राऊत,श्री कृपाळसिंग चाैरे आणि  गोयगाव येथील श्री मधुकर कुचनकर, श्री एकनाथ तुकाराम पेटकर, श्री निलकंठ सोनेकर, श्री बाबुराव पेटकर, श्री अनिल मडावी, श्री  रामा कोडापे, श्री विजय ढवस, श्री खुशाल दरेकर आदी मान्यवरांचा समावेश आहे.
          
या प्रसंगी श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्वांनी काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले तर आनखीही प्रमुख पक्षातील अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत अशी माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. लांडे सांगितले. 

      
या प्रसंगी  श्री दादाजी पाटील लांडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी राजुरा, श्री नंदकिशोर वाढई कार्याध्यक्ष, श्री अशोकराव देशपांडे खजिनदार, साै. कुंदाताई जेनेकर सभापती, श्री संतोष गटलेवार शहर अध्यक्ष , श्री एजाज अहमद अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस , सरचिटनीस श्री धनराज चिंचोलकर, नगरसेवक श्री आनंद दासरी, श्री मनोहर उलमाले, श्री अविनाश जेनेकर, गोवरीचे श्री हरिचंद्र जुनघरे, श्री शिवराम लांडे श्री गोपीनाथ जमदाडे , रामपूरचे श्री  कोमल पूसाटे, श्री ईश्वर दुपारे, श्री प्रभाकर बगेले, श्री दिलीप इटनकर, श्री उध्दव चापले, श्री रमेश मोरे, श्री यादव लांडे, गोयगावचे श्री मारोती पिदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
       
कार्यक्रमाचे संचालन श्री नंदकिशोर वाढई यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एजाज अहमद यानी मानले.