सेडेगाव येथील कार्यकर्त्यांचा आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सेडेगाव येथील कार्यकर्त्यांचा आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (अरविंद राऊत : चिमूर)-
भारतीय जनता पार्टीच्या सबका साथ सबका विकास या ध्येय धोरणांवर व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या विकास कामांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत चिमूर विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षाकडे ओघ वाढत आहे.


त्यामुळे अनेक कार्यकर्ते भाजपात पक्ष प्रवेश वाढत आहे त्यामुळे चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सेडेगाव येथील कार्यकर्त्यांनी प्रशांत मारगोणवार यांच्या नेतृत्वात भाजपात पक्षप्रवेश केला.

पक्ष प्रवेश करणारे हिरामण दडमल,प्रवीण सोनटक्के, सुभाष डांगे,तुकाराम मसराम,प्रवीण बोबडे,प्रवीण नंन्नावरे यांचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले व पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या.

या वेळी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर,भाजपा जेष्ठ नेते निलमजी राचलवार,प.स.सदस्य पुंडलिकजी मत्ते,नगर सेवक सतिश भाऊ जाधव, नगर सेविका भारतीताई गोडे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मुंगले,भाजपा विस्तारक सुनील किटे,टीमुजी बलदुवा,रवी ठाकरे,आकाश ढबाले,हरीश पिसे,वभाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.