विध्यार्थ्यानी संतप्त होऊन केली महामंडळाच्या बस ची तोडफोड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विध्यार्थ्यानी संतप्त होऊन केली महामंडळाच्या बस ची तोडफोड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (शोएब शेख :राजुरा):
-सायंकाळी 5 ची बस पोहोचली रात्री 8वाजता : 30 विद्यार्थी होते ताटकळत.

शिक्षणासाठी सोनुर्ली येथून राजुरा येथील विविध महाविद्यालयात ये जा करणाऱ्या  विध्यार्थ्यांना राजुरा बस स्थानकावर असुविधेचा सामना करावा लागला. 

राजुरा येथून सोनुर्ली गावात रोज सायंकाळी 5 वाजता जाणारी बस क्रमांक एमएच 14 बी टी 4656 रात्री  8वाजता पोहचली. शाळा व महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर अनेक विध्यार्थी उपाशी तापाशी गावाकडे परतण्यास दुपारपासून बस स्थानकावर बसयेण्याची वाट बघत होते आगारात  वारंवार विचारणा करूनही बस बद्दल कोणतीही माहिती कर्मचारी देत नव्हते. जवळपास 30विद्यार्थी ज्यात जास्तीत जास्त अल्पवयीन मुलींचा समावेश होता पालकांच्या भीतीने चिंताक्रांत होत्या.

 त्यातल्या त्यात असा प्रकार महामंडळाकडून वारंवार होत असल्याने रात्री 8वाजले तरी बस चा ठावठिकाणा नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानकावर बस पोहोचताच बस चा घेराव करत चालकास या नियमित प्रकारचा जाब विचारणे सुरु केले.त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने विद्यार्थ्यांनी बस ची तोडफोड सुरु केली.

सर्व प्रकार बघून महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण संतप्त विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सदर घटनेची माहिती कळताच बबन उरकुडे यांनी स्थानकाकडे धाव घेतली व विध्यार्थ्यांना समज देत घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याचे आश्वासन चालक व अधिकाऱ्याकडून घेत विध्यार्थ्यांना सोनुर्ली कडे रवाना केले.