इको-प्रो व एफईएस महाविद्यालयाचा अनोखा व्हॅलेन्टाईन दिवस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इको-प्रो व एफईएस महाविद्यालयाचा अनोखा व्हॅलेन्टाईन दिवस

Share This
-विद्यार्थीनीची मानवी साखळी तयार करून या ऐतिहासिक वास्तु संवर्धन करण्याचा संदेश

खबरकट्टा / चंद्रपूर :

व्हॅलेन्टाईन दिनानिमीत्त इको-प्रो व एफईएस गल्र्स महाविद्यालया तर्फे गोंडराजे बिरशहा यांच्या समाधीस पुष्पअर्पण या कार्यक्रमाचे तसेच ऐतिहासिक वास्तु संवर्धनाच्या दृष्टीने आयोजन करण्यात आले होते.

एका राणीने आपल्या पतीच्या आठवणीखातीर बांधलेली समाधी म्हणजे ‘प्रेमाचे प्रतीक’ म्हणुन राजा बिरशहा यांच्या स्मारकाकडे पाहले जाते. रानी हिराईने राजा बिरशहा यांच्या मृत्युनंतर त्यांचे प्रती असलेले प्रेम स्मारकापुरते मर्यादीत न ठेवता आपल्या कार्यातुन अजरामर केले आहे, त्याचा कार्याचा उजाळा आजच्या युवा पिढीला माहीत व्हावे, आणी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रेमाचा खरा अर्थ कळावा याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदा 14 फेब्रुवारी रोजी सर्विकडे ‘व्हॅलेन्टाईन दिनाची’ धुम असताना इको-प्रो व एफईएस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजा बिरशहा यांच्या समाधीस पुष्पअर्पण करण्यात आले. यावेळी महाविदयालयाच्या विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. सदर ऐतिहासिक वास्तु संवर्धनाकरिता विदयार्थीनी या वास्तुनां घेरून मानवी साखळी तयार करीत या वास्तु संवर्धनासाठी युवंकानी पुढाकार घ्यावा असा संदेश यावेळी दिला.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्या सौ सरोज झंझाळ, प्रा डाॅ मुकुंद देशमुख, प्रा डाॅ राजेश, चिमणकर, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, प्रा डाॅ सुखदेव उमरे, प्रा. डाॅ राजेंद्र बारसागडे यांच्या उपस्थितीत सदर उपक्रम पार पडला. यावेळी प्राचार्या सौ सरोज झंझाळ यांनी अध्यक्षीय भाषणात या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले. राजराजा बिरशहा यांची समाधी रानी हिराईने बांधुन त्यांच्याप्रती असलेले प्रेम आपल्या कार्यातुन अजरामर केले, रानी हिराई च्या कार्याचा इतिहास आपण जाणला पाहिजे. गोंडराजे बिरशहा यांची समाधी म्हणजे निरागस प्रेमाचे प्रतीक असुन ही ऐतिहासिक वस्तुचे जतन होने गरजेचे आहे. इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी, गोंडकालीन इतीहासाची माहीती देत, ऐतिहासिक वास्तु संवर्धनाची गरज, राजा बिरशहा व रानी हिराई याबाबत माहीती दिली तसेच युंवकानी क्षणभंगुर प्रेमांच्या मागे न लागता आपल्या विवीध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशीष्ट दिवसांची गरज नसुन ते आपल्या वागणुकीतुन नी् कार्यातुन व्यक्त व्हायला पाहीजे. असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी एफईएस गर्ल्स काॅलेजचे प्रा डाॅ प्रमोद रेवतकर, प्रा डाॅ सचिन बोधाने, प्रा. डाॅ मेघमाला मेश्राम, प्रा. डाॅ सुवर्णा कायरकर, प्रा. विदया जुमडे, प्रा. मिना गाडगे, प्रा. मिनाक्षी ठोंबरे, प्रा. प्रज्ञा जुनघरे, तसेच इको-प्रो चे धर्मेद्र लुनावत, अनिल अडगुरवार, बिमल शहा, राजु काहीलकर, सचिन धोतरे, कपील चैधरी, आयुषी मुल्लेवार, पुजा गहुकर, सारीका वाकुडकर प्रामुख्याने उपस्थित होते.या उपक्रमात इको-प्रो नगर संरक्षक दलाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा योजनाचे शेकडो विद्यार्थीनी सहभागी होते.