वनकर्मचारी यांच्यावर केला प्राणघातक हल्ला:वनविभाग च्या कार्यालयाची नागरिकांनी केली तोडफोड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वनकर्मचारी यांच्यावर केला प्राणघातक हल्ला:वनविभाग च्या कार्यालयाची नागरिकांनी केली तोडफोड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(चिमूर )-
पळसगावं येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाची  नागरिकांनी केली तोडफोड व वनविभागाच्या कर्मचारी यांच्या वर नागरिकांनी  केला प्राणघातक हल्ला दिनांक २४/ २/२०१९ ला मौजा पळसगांव येथील कक्ष क्रंमाक नियत क्षेत्र 1 मध्ये  224  येथे पिपर्दा येथील 8 महिला जंगलात दिसल्या  असताना चंद्रपूर येथील डिएफओ मा गृरुप्रसाद सर यांनी नियत क्षेत्र 1 मध्ये पकडले आरोपींना समोरील कार्यवाही करण्याकरीता आरोपींना पळसगावं येथील वनकार्यलयात आणले असता  पुढील कार्यवाही करीत असताना पिपर्दारोड कढून जमाव एकदम चालून आला नागरिक ही बातमी कळली असता नागरिकांचा जमाव  चालून आला कुठलेही विचारपूरस न करता एकदम वनविभाची गेटला लाथा मारून गेटची तोडफोड केली.


वनविभागाच्या दिसेल त्या वस्तूची तोडफोड केली, आरोपीने  बळजबरीने वनकार्यलयात आणल्या मुळे नागरिकांनी ग्रामस्तानी पळसगावं येथील वनपरिक्षेत्र कार्यालवर हल्ल करून फिरते पथक यांच्या कर्मचारी तंबूडगे,नेवारे, सोनेकर कसार  आभारे या यांच्यावर सुद्धा हला करून त्यांना जखमी करण्यात आले त्याना पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णलाय चिमूर येथे वैद्यकीय उपचाराकरिता रवाना करण्यात आले. 

वनविभाग फिरते व्याघ कृती दल यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या वनविभागाच्या 3 वाहनावर जमावाने हल्ला करून तोडफोड केली,परिसरातील  वनविभागच्या  त्रासामुळे लोकचा जमाव चालून आला की काय हे मात्र कळायला मार्ग नाही,सदर प्रकार घडला त्या वेळेस वनमहिला कर्मचारीसुद्धा उपस्थित होत्या सदर प्रकारामुळे वनविभाची लाखो रुपयांची नुकसान झाली असून सदर कृत करण्यर्यांना कठोरात कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे , मा ,भागवत साहेब,कुलकर्णी साहेब वनाधिकारी चंद्रपूर,मा,जाधव मॅडम,मुरकुटे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगांव ,मा,मडामे ठाणेदार साहेब यांच्या सह वनकर्मचारी पोलीस रात्रौ 3 वाजेपर्यंत आरोपींना धरपकड सुरु होती .