चिमूर तालुक्यातील विहीरगांव येथील दोन घरे आगीत जळून खाक. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर तालुक्यातील विहीरगांव येथील दोन घरे आगीत जळून खाक.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर प्रतिनिधी):

चिमुर तालुक्यातिल विहीरगांव येथे काल दिनांक 12फेब्रुवारी  रात्रौ अचानक लागलेल्या आगीने भडका घेऊन, रौद्ररूप धारण केल्याने गांवातील श्री. किसन रामाजी दडमल, व श्री. गोपीचंद रामाजी दडमल यांची घरे जळून बेचिराख झालीत. 


घरातील व्यक्ती रात्रौ ला झोपेत असताना १२ वाजता चे सुमारास आग लागल्याने व कुनाचे लक्षात न आल्याने आगीचे तडाख्याने एक घर पुर्ण जळून खाक झाले. तर लागूनच असलेले दुसरे घर नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग विझविण्याच्या प्रयत्नात अर्धवट जळाले. घरातील धान्य, कपड़े लत्ते जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबावर सध्यातरी उपासमारीची वेळ आली आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानि झालेली नाही. परंतु घरातील मालमत्ता संपुर्ण जळून खाक झाली.

लागलेल्या आगीमुळे दडमल कुटुंबातील सदस्याचे आरडाओरडा केल्याने गांवातील जनता हातात जे भांडे भेटेल त्यात पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. परंतु आगीच्या रौद्ररूपासमोर कांही एक चालले नाही. 

मात्र आग आटोक्यात आणण्यासाठी गावकर्‍यांनी कसोशीने प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. परंतु नागरिकांचा संशय असा आहे की घरातील चुलीतील जळत्या निखार‍याने आग लागली असावी. नेमके कारण मात्र कळू शकले नाही. गावकरी जनतेची मागणी आहे की, आगीत जळालेल्या घराचा प्रशासनाकडून पंचनामा करून दोन्ही दडमल कुटूंबीयांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी गांवातील नागरीकांची रास्त अपेक्षा आहे.