रामचंद्रराव धोटे महाविद्यालयत युवा संसद चे यशस्वी आयोजन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रामचंद्रराव धोटे महाविद्यालयत युवा संसद चे यशस्वी आयोजन.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके : राजुरा ):

रामचंद्रराव धोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक ९ वाजता राज्यशास्त्र अभ्यास मंडळ आणि लोकशाही क्लबच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही पंधरवडा अंतर्गत युवा संसद चे आयोजन करण्यात आले होते.


या युवा संसदेत लोकसभेच्या सभापती म्हणून बी. ए. तृतीय वर्षाची विद्यार्थ्यांनी कु. शितल लोणारे हिने काम पाहिले. सत्ताधारी पक्षाच्या वतीने मंत्रिमंडळात पंतप्रधान म्हणून कु. यामीनी गिरसावडे, गृहमंत्री आदर्श खोब्रागडे, रेल्वेमंत्री सुनील गेडाम, कृषीमंत्री भवानी दोब्बलवार, शिक्षणमंत्री मंगला साडवे, क्रीडामंत्री अजय मडावी, महिला व बालकल्याण मंत्री आशा बच्चलवार, अर्थमंत्री सुमलता जित्तापेन्नावार, आरोग्यमंत्री साक्षी लभाणे, समाजकल्याण मंत्री अश्विनी बोढे, परराष्ट्रमंत्री गणेश मडावी यांनी तर विरोधी पक्षनेते म्हणून बी. काॅम तृतीय वर्षाच्या कु दर्शना मेश्राम, विरोधीपक्ष सदस्य गौतमी भोयर, आशिष मडावी, सुकन्या निषाद, सुरज गुरूनुले, प्रणाली घोंगरे, दिपक देठे, उमेश इसनकर, आणि अपक्ष बी. एस्सी द्वितीय सना सय्यद, चैताली मोरे, आदींनी भुमिका पार पाडल्या. महासचिव म्हणून बी. ए. प्रथम वर्षांची कु ऋतूजा भोयर हिने संगणक तज्ज्ञ सागर तोडासे, स्टेनोग्राफर अंकिता कौरासे यांनी तर विदेशी शिष्टमंडळ सदस्य ईश्वरी गेडाम (अमेरिका), कल्याणी ढवस (रशिया), दमयंती (इंग्लंड) आणि पत्रकार म्हणून लिना कुमरे, भारती मडावी, प्रवीण दुर्गे यांनी तर पहारेकरी म्हणून मंगलसिंग ढिल्लो आदींनी भुमिका पार पाडल्या. उत्कृष्ट संसदपटू म्हणून खा. सुनील गेडाम यांचा गौरव करण्यात आला. 

या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य तथा राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रफुल्ल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. समिर पठाण, प्रा. निश्चल इटणकर, प्रा. सत्यपाल उरकुडे, प्रा. मधुकर साळवे, प्रा. नरेंद्र धोबे, ग्रंथपाल प्रविण बुक्कावार, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह लोकशाही क्लबचे अध्यक्ष सुनील गेडाम आणि संपूर्ण टिमने अनमोल सहकार्य केले.