अमृत योजनेच्या बांधकामातील कामगार पाण्याच्या टाकीवरून खाली पडून गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अमृत योजनेच्या बांधकामातील कामगार पाण्याच्या टाकीवरून खाली पडून गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
काल दिनांक 10फेब्रुवारी 2019 रोजी  दुपारी 3:30च्या दरम्यान  सरकार नगर येथे नवीन बांधकाम सुरु असलेल्या शासकीय नळ योजनेच्या पाण्याच्या टाकी वरून आनंद उईके (वय 25) हा बांधकाम मजुरीचे काम करीत असताना वरून घसरून खाली पडला असून त्याला डोक्याला जबर मार बसला असून गंभीर रित्या जखमी झाल्यामुळे  तात्काळ सीएचएल रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले  असता सदर दवाखान्यातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत जखमी हा कोमात गेलेला असून त्याला  त्याला मेयो हॉस्पिटल नागपूर येथे हलविण्यास सांगितले.

सदर कामाचे कंत्राटी अमृत योजनेतील काम करील असलेले कंत्राटदार हेमंत सलामे यांचेकडे असून. अमृत योजनेचे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर शहरात सर्वत्र कामे सुरु असून अनेक बांधकाम मजूर कार्यरत आहेत,मजुरांच्या सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसऊन काम सुरु आहे.

सदर मजूर गंभीर रित्या जखमी असून  कोणत्याही शासकीय किंवा कंत्राटदाराकडील अधिकृत व्यक्तीने त्यांना भेट दिली नसून त्यांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न ऐरणीवर आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा बांधकाम मजुरांवरील कंत्राटदारकडून होणारी पिळवणूक व शोषनाचा विषय चर्चेत आहे