पुण्याच्या भारतीय विद्यार्थी संसदेत चमकला राजुराचा शंतनू धोटे. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुण्याच्या भारतीय विद्यार्थी संसदेत चमकला राजुराचा शंतनू धोटे.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके / राजुरा):

भारतीय विद्यार्थी संसदचे 9 वे अधिवेशन पुणे येथे नुकतेच संपन्न झाले. या तीन दिवसीय अधिवेशनात देश-परदेशातील जवळपास आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांनी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडत वास्तविक परस्थिति आणि अपेक्षा यावर नेमके बोट ठेवले.
                

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करनारे चंद्रपुर जिल्ह्या युवक कॉंग्रेसचे महासचिव शंतनु धोटे यांनी न्यायपालिकेतिल गोंधळ या विषयावर आपले विचार व्यक्त करत श्रोत्यांची मनं जिंकून घेतले. 

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ. अभिषेक सिंघवी (राज्यसभा खासदार), प्रशांत भूषण (ख्यातनाम वकील),माजिद मेनन (राज्यसभा खासदार),तुषार गाँधी (वरिष्ठ पत्रकार),राहुल कराड (संस्थापक अद्यक्ष, एम.आय.टी.)  शंतनू धोटे यांनी आपल्या भाषनात वेगवेगळ्या केस चे दाखले देत त्यातील गोंधळ आणि सरकारचा न्यायपालिकेतिल हस्तक्षेप यावर सरकारला धारेवर धरले. शंतनू अजय धोटे हे चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतणे असून आपल्या राजकीय वारस्याचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी आपल्या कामगिरीतून करीत राजकीय चाणक्यांच्या गळ्यातील ताईत ते बनले आहेत. 

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल चंद्रपूर काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, युवक काँग्रेसचे हरिष कोत्तावार, एजाज अहमद, आशिफ सय्यद, संतोष गटलेवार, प्रा. आशिष देरकर प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, हेमंत झाडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.