अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे-बघूया कोणाला काय मिळाले..?? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे-बघूया कोणाला काय मिळाले..??

Share This
खबरकट्टा / विशेष :

-केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. 

महत्वाचे मुद्दे :

🔶5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री
🔶आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर
🔶60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार पेन्शन
🔶देशात क्लीन एनर्जीचा वापर वाढविण्यावर भर देणार
🔶रस्ते, रेल्वे, हवाईसेवा सुधारण्यावर भर  
🔶1 करोडपेक्षा अधिक जणांनी नोटबंदीनंतर इन्कम टॅक्स भरला
🔶करदात्यांच्या संख्येत वाढ, यंदा 12 लाख कोटी करस्वरूपात मिळाले
🔶आयकरात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे  
🔶मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वच परवानग्या एकाच खिडकीवर
🔶संरक्षण खात्यासाठी आजवरचा सर्वात मोठा निधी दिल्याचा दावा. 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची तरतूद करणार  
🔶ऑनलाईन व्यवहाराने सर्व चित्र बदलले, जन-धन योजनेचा मोठा वाटा
🔶ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणले, मिझोरम त्रिपुरा रेल्वेच्या कक्षेत  
🔶येत्या 5 वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती
🔶भारतात जगातील सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते, सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा  
🔶5 वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली, 100 हुन अधिक विमानतळ कार्यरत
🔶रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद, वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात
🔶दररोज देशात 27 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती  
🔶जोखीम असलेल्या पदांसाठी भत्त्यात वाढ, वन रँक, वन पेन्शन योजना लागू  
संरक्षणासाठी 3 लाख कोटींहून अधिक कर्ज
🔶गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांच्या पगारी रजेची तरतूद
🔶मुद्रा योजनेत 15 कोटींचे कर्जवाटप, मुद्रा योजनेचा 70 टक्के महिलांना लाभ
🔶गेल्या 5 वर्षात देशाचा आत्मविश्वास वाढवला, वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था
🔶असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना, 60 वर्षे पार कामगारांना 3 हजार रुपये पेन्शन
ग्रॅच्युईटीची मर्यादा 10 लाखांहून 20 लाखांवर, 10 कोटी असंघटित कामगारांसाठी केंद्राची श्रमयोगी पेन्शन योजना.