स्वच्छता सर्वेक्षण वाहन राजुरा तालुक्यात दाखल : स्वच्छ भारत मिशन चा प्रसार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्वच्छता सर्वेक्षण वाहन राजुरा तालुक्यात दाखल : स्वच्छ भारत मिशन चा प्रसार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा / राजुरा ):

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण 2019 ला यशस्वी  करण्याकरिता आणि जनमानसात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण कारण्याकरिता प्रचार वाहन  जिल्हा परिषद तर्फे रवाना करण्यात आले होते.


भ्रमणान्ती सदर वाहन राजुरा तहसील येथे पोहचले असता राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामवत व विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्याकडून हिरवी झेंडी दाखविण्यात आली. 

या स्वच्छता प्रचार वाहनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन ही महत्वकांशी योजना जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. या योजने अंतर्गत प्रेत्येक ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक उपचार केंद्र, सोबतच सर्व सार्वजनिक स्थळांची साफसफाई ठेवण्यास वाहनात असलेल्या एलसीडी च्या माध्यमातून चित्रफीत दाखवून गावागावात दिली जात आहे.

यातून सर्व सार्वजनिक स्थळे, ग्रामपंचायत भवन, आठवडी बाजार, सार्वजनिक सौचालाय स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जात आहे. तालुक्यात प्रचार सुरु असून पहिल्या दौऱ्यात माथरा खामोना गट ग्रामपंचायत चे सरपंच लहुजी चहारे व गोवरी ग्राम पंचायत च्या सरपंच पौर्णिमा उरकुडे यांनी गावातील लोकांना माहिती देत स्वच्छतेस प्रवृत्त केले.