शेतकरी विरोधी BJP सरकार ला हदपार करायच :राजु झोडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी विरोधी BJP सरकार ला हदपार करायच :राजु झोडे

Share This
-शेतकर्यांच्या विविध मांगण्याना घेऊन  बिआरएसपी चा जिल्हाधिकार्यालयावर  मोर्चा
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा ):

बिआरएसपी विदर्भ प्रदेश महासचिव राजुभाऊ झोडे यांच्या नेत्रुत्वात शेचकर्यांच्या मुलभुत मांगण्याना घेऊन भव्य मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पक्षाचे विदर्भ प्रदेश महासचिव राजुभाऊ झोडे यांच्या नेत्रुत्वात गिरणार चौक चंद्रपूर येथुन हजारोच्या संख्येनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्याच्या मांगण्याना घेऊन मोर्चा निघाला.
शेतकरी विरोधी सरकारच्या फसव्या योजना विरोधात शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

जबरानजोत शेतकर्याना पट्टे मिळाले पाहीजे,शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्यात यावा,शेतकर्यांना दरमहा 5000 रु पेन्शन मिळाली पाहीजे,चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यात याव्या,गावरान गायठान जमीनीचा प्रश्न तात्काळ सोडवावा,क्रुषीपंपाना मोफत विद्युत देण्यात यावी,स्वामीनाथन आयोग लागु करावा,चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होऊनही त्याची अमलबजावनी होत नाही आहे त्याची अमलबजावणी लवकरात लवकर करावी,शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात यावी,शेतकर्यांना विनाअट शेतीकर्ज देण्यात यावे,जमिन हद्द कायम मोजमापणी करुण द्यावी अशा विविध मांगण्याना घेऊन हा मोर्चा निघाला.

गिरणार चौकापासुन निघालेल्या मोर्चा मध्ये शेतकर्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात  आपला आक्रोश व्यक्त करत मांगण्या मान्य झाल्या पाहिजे याकरिता जोरदार नारेबाजी केली.राजुभाऊ झोडे यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलतांना सांगितले की,ही सरकार शेतकरी विरोधी असुना सरकारच्या काळात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. 

शेचकर्यांचे बरेच प्रश्न आहेत पण सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.शेतमालाला भाव नाही,सिंचनाच्या सोयी नाही,जमीनीचे प्रश्न अशा बर्याच संकटाचा सामना शेतकरी करत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला असुन त्यांचा कोणिच वाली नाही. अशा परिस्थीतीत शेतकर्यांसाठी त्यांच्या न्यायहक्कासाठी बिआरएसपी सोबत राहुन लढा देईल व न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहील असे मोर्चात आपले परखड मत मांडले. जिल्हाधिकारी यांना मोर्चाचे शिष्टमंडळ यांनी निवेदन देऊन शेतकर्यांच्या मागण्या पुर्ण कराव्या अन्यथा याहीपेक्षा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला.
सदर शेतकरी मोर्चाचे प्रमुख नेत्रुत्व राजुभाऊ झोडे यांनी केले तर मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक बिआरएसपीचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी, विदर्भ उपाध्यक्ष रमेश पिसे, विदर्भ प्रदेश महासचिव जि.एम.खान ,रमेश पाटिल ,विलाश मोगरकर,संजय बोधे,मोनल भडके बिआरएसपी चे पदाधिकारी व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थीत होते. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापूढे हि सरकार च्या विरोध्यात तिव्र आंदोलन सुरु करण्याच्या संकल्प जिल्हातील शेतकर्यानी घेतला व मोर्च्या च्ये आभार अशोक बनकर ने केला.