आजचे राशिभविष्य : 9 फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशिभविष्य : 9 फेब्रुवारी 2019

Share This

खबरकट्टा / आजचे राशिभविष्य :

मेष :

दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. आज अस्वस्थ व्हाल. निरर्थक खर्चाचे प्रमाण वाढेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. परोपकाराच्या नादात काहीतरी गमवावे लागण्याची शक्यता आहे. आध्यात्मिकतेची आवड निर्माण होईल. लाभाच्या लालसेपोटी फसू नका. निर्णयशक्तीचा अभाव असल्याने द्विधा मनस्थिती होईल.


वृषभ :


दिवस आनंददायी असेल. लक्ष्मीच्या कृपेने व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. परिवारातील सदस्य आणि मित्रांसोबत वेळ आनंदात घालवाल. नवीन संपर्क आणि परिचय व्यापारात लाभदायक ठरतील. छोटा आनंददायी प्रवास कराल. आजचा पूर्ण दिवस मन उल्हासित आणि प्रसन्न राहील.मिथुन :


आज मन आणि शरीर प्रसन्न राहील. व्यावसायिक क्षेत्रात कामाची प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ आनंदात जाईल. व्यवसायात पदोन्नती होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील कामेही यशस्वीपणे पूर्ण होतील.


कर्क :


आजचा दिवस भाग्योदय होण्याचा दिवस आहे. परदेशी किंवा दूरच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता कळतील. छोटा प्रवास किंवा धार्मिक यात्रेमुळे मन अधिक प्रसन्न होईल. आरोग्य चांगले राहील. मनही प्रसन्न राहील. मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ मजेत जाईल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळेल. अचानक घनप्राप्तीचा प्रबळ योग आहे. परदेश गमन आणि धार्मिक कार्यात यश मिळेल.


सिंह :


आज आरोग्याची अधिक काळजी घ्या. आरोग्यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आज खाणे-पिणे घरीच केल्यास लाभदायक राहील. वैचारिकदृष्ट्या नकारात्मकता जाणवेल. ती दूर करण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिकतेत रुची, ध्यान आणि जप आपल्याला योग्य मार्गावर आणतील. ज्यामुळे मानसिक अस्वस्थता खूप कमी होईल.कन्या :


आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. यश किर्ती प्राप्त होणे सोपे जाईल. व्यापारी क्षेत्रात भागीदारांसोबत संबंधामध्ये सकारात्मकता वाढेल. वस्त्राभूषणांच्या खरेदीने मन आनंदी राहील. मित्रांसोबत प्रवासाचा आनंद घ्याल.


तूळ :


आरोग्य चांगले राहील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. परिवारातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याचे भान ठेवा. कार्यात सफलता आणि यशही मिळेल.


वृश्चिक :


वाद-विवादात पडू नका. मुलांची चिता राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढेल. शेअर आणि सट्ट्यात गुंतवणूक करू नका. शक्य असल्यास यात्रा, प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजनासाठी वेळ अनुकूल आहे. परिश्रमानुसार यशही प्राप्त होईल.


धनु :


आज मानसिकदृष्ट्या निरुत्साह जाणवेल, ज्यामुळे मन अशांत राहील. परिवारातील वातावरण क्लेशदायक राहील, कारण परिवारातील सदस्यांसोबत कुरबुरी होण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्तेचे दस्ताऐवज करताना विशेष लक्ष द्या. पैशांची हानी होण्याची शक्यता आहे. मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आईच्या आरोग्याची चिंता राहील. छातीत दुखण्याची शक्यता आहे.


मकर :


मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्तेविषयीचे काम आज आपण करू शकाल. व्यावसायिकांसाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम आहे. प्रतिस्पर्धी पराजित होतील.आरोग्य चांगले राहील. आज आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. नवीन कार्याचा शुभारंभ कराल.


कुंभ :


द्विधा मनस्थितीमुळे एखादा निश्चित निर्णय घेण्यात अडचणी येतील. निरर्थक खर्च होणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावरील संयम सुटल्याने परिवारातील सदस्यांसोबत छोट्या-मोठ्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मन एकाग्र करण्यसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील. काम पूर्ण होण्यास विलंब लागेल.


मीन :


आज मन आणि शरीर प्रसन्न राहील. उत्साहाचे वातावरण असल्याने नवीन कार्याची प्रेरणा मिळेल. पारिवारीक वातावरणात सुख-शांती नांदेल. मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत प्रवास कराल. धनप्राप्तीचा योग आहे. धार्मिक यात्रा किंवा धार्मिक कार्याचा आज योग आहे.