आजचे राशीभविष्य : 7फेब्रुवारी 2019 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे राशीभविष्य : 7फेब्रुवारी 2019

Share This
मेष :
आजचा दिवस सामाजिक कार्य आणि मित्रांसोबत घालवाल. आपल्या मित्रपरिवारात नव्या मंडळींचा समावेश होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. वडिलधाऱ्यांकडून लाभ होईल आणि त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मन प्रसन्न होईल. दूर राहणाऱ्या मुलांकडून शुभवार्ता कळतील. प्रवास पर्यटनाचे यशस्वी नियोजन कराल. वृषभ :


नोकरीत पदोन्नतीच्या वार्ता कळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सरकारी निर्णय आपल्या बाजूने लागल्याने लाभ होईल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. नवीन कामे हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. दांपत्यजीवनात आनंद राहील. आरोग्य उत्तम राहील. धन आणि मान-सन्मान मिळेल. व्यापाऱ्यांना थकबाकी वसूल करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.


मिथुन :


आज आपल्याला प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे ज्यामुळे कोणतोही कार्य करण्याचा उत्साह मंदावेल. नोकरी-धंद्याच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्यांचा व्यवहार सहयोगपूर्ण असल्याने मन निराश होईल. मुलांच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागेल. विरोधकांसोबत वाद विवादात सहभागी होणे हिताचे नाही. वडिलांना त्रास होईल.कर्क :

आज नकारात्मक विचार मनात घर करतील. रागाचे प्रमाण अधिक राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनैतिक कामवृत्ती आणि चोरीसारख्या विचारांवर संयम ठेवा, नाहीतर अनिष्ट ओढवण्याची शक्यता आहे. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचण जाणवेल. आध्यात्मिकतेची कास धरा.St


सिंह :


मनोरंजन आणि हिंडण्या फिरण्यात दिवस जाईल. संसारिक बाबतीत आपल्या व्यवहारात उदासीनता राहील. जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. भिन्न लिंगी व्यक्तीची झालेली भेट आनंददायक राहील. व्यापाऱ्यांना भागीदारांसोबत धीराने घ्यावे लागेल. सार्वजनिक तसेच सामाजिक जीवनात यश कमी मिळेल.


कन्या :


परिवारात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असल्याने आपले मन प्रसन्न राहील. आरोग्य चांगले राहील. आजारी व्यक्तींची तब्येत सुधारल्याने समाधान लाभेल. कामात सफलता आणि यस मिळेल. कार्यालयात सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यापार आणि धंद्यात प्रतिस्पर्धी आणि विरोधकांकडून नुकसान संभवते. परदेशी नातेवाईकांकडून शुभ समाचार मिळतील.तूळ :


आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्तीला चांगल्या प्रकारे चालना द्याल. बौद्धिक चर्चा आणि प्रवृत्तीमध्ये भाग घ्यायला तुम्हाला आवडेल. मुलांकडून आनंदवार्ता कळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट झाल्याने आनंद होईल. विचारांची गर्दी झाल्याने मन विचलित होईल. आरोग्य उत्तम असल्याने सर्वसाधारणपणे सर्वच कामे कराल.


वृश्चिक :
आजचा दिवस शांततेत व्यतीत करा. आरोग्य बिघडेल, मनही अस्वस्थ असेल. आईच्या आरोग्याची चिंता राहील. परिवारातीस सदस्यांसोबत तू-तू-मै-मै झाल्याने मन दु:खी होईल. स्थावर मालमत्ता तसेच वाहन आदींचे दस्ताऐवज करताना सावधानता बाळगा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून दूर राहा.धनु :


आज गूढ रहस्यवाद आणि आध्यात्मिकतेची आवड निर्माण होईल. विषयात अधिक रस घ्याल. नवीन कार्याची प्रेरणा मिळेल. आरोग्य चांगले राहील आणि आपले मन प्रसन्न राहील. छोटी यात्रा घडण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांची झालेली भेट सुखद असेल. भाग्याची साथ लाभेल. व्यापार आणि धंद्यात प्रगती होईल.मकर :
न बोलण्याने अनेक गोष्टी साध्य होतात यानुसार जर वाणीवर संयम ठेवल्यास अर्थाचे होणारे अनर्थ टळतील. परिवारातील सदस्यांसोबत रुसवे-फुगवे होणार नाहीत यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. आरोग्य मध्यम राहील. उजव्या डोळ्याचे दुखणे बळावण्याची शक्यता आहे.


कुंभ :
शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. परिवारातील सदस्यांसोबत रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल. चिंतनशक्ती आणि आध्यात्मिक शक्ती चांगली राहील. दांपत्य जीवनात मधुरतेचा आनंद घ्याल. भेटवस्तू आणि घनप्राप्ती होईल. प्रफुल्लतेने आजचा दिवस व्यतीत कराल.


मीन :


कमी वेळात मिळणाऱ्या लाभाची हाव सोडून द्या. गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. आज मनाची एकाग्रता कमी राहील. शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मुलांच्या समस्यांनी पेचप्रसंग निर्माण होईल. स्वकीयांपासून ताटातूट होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात पैसे खर्च होतील. महत्त्वपूर्ण दस्ताऐवज किंवा कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सावधानता बाळगा. पैशांच्या देवाण घेवाणीसाठी वेळ अनुकूल नाही.