शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर रामपूर ग्रामविकास बहुद्देशीय संस्थेचे आयोजन; 59 रक्तदात्यांनी केले रक्तदान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर रामपूर ग्रामविकास बहुद्देशीय संस्थेचे आयोजन; 59 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा- राजुरा)

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत रामपूर ग्रामविकास बहुद्देशीय संस्था रामपूर यांच्या वतीने दिनांक 19 रोज मंगळवारला सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सकाळी स्थानिक हनुमान मंदिर सभागृहात रक्तदान शिबिराचे उदघाटन गावचे जेष्ठ नागरिक महादेव उरकुंडे यांनी उदघाटन केले. यावेळी जेष्ठ नागरिक बाबुराव जंपलवार, प्रभाकर लडके, गावच्या सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच हेमलताताई ताकसांडे, ग्रामपंचायत सदस्य विलास कोदिरपाल, रमेश झाडे, जगदीश बूटले, सिंधुताई लोहे, सुनीता उरकुडे, अनिता आडे, संगीता विधाते, लक्ष्मीताई चौधरी, ग्रामविकास अधिकारी अधिकारी अमरदीप खोडके, संस्थेचे अध्यक्ष नामदेव गौरकार यांची उपस्थिती होती.

यावेळी 59 महिला व पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदात्यांना गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव प्रकाश उरकुंडे, गणेश खाडे, देविदास मालेकर, महादेव बोढाले यांनी मंडळाच्या वतीने कॉफी, बिस्कीट, फळ व ग्रामगीता वाटप करण्यात आली. 

याशिबिराकरिता संस्थेचे सचिव सुयोग साळवे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, सुनील गौरकार, प्रवीण हिंगाणे, कपिल इटनकर, अक्षय कायडिंगे, जयश्री रोगे, हर्षल गौरकर यांनी केले आहे.